महात्मा ज्येतीबा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती मोहत्साव सासवड येथे संपन्न.
सासवड प्रतिनिधी दि.१७
पुरंदर तालुक्यातील सासासावड येथील. शिवतीर्थ येथे महात्मा ज्येतीबा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती मोहत्साव आज दिनांक १७ एप्रिल रोजी उत्साहात साजरा करण्यात आला .
सासवड येथे दर वर्षी सिद्धार्थ सामाजिक प्रतिष्ठान आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पुरंदरच्यावतीने सासवड येथे महात्मा ज्येतीबा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती मोहत्साव साजरा करण्यात येतो.
आज जिल्हा बेंकेचे संचालक प्रवीण शिंदे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर भारतीय राज्यघटना व युवकान पुढील सामाजिक व सांस्कृतिक आव्हाने याविषयावर डॉ.मिलिंद कसबे व आजची लोकशाही व आजची मुस्लिमाची सद्यस्थिती याविषयावर मा.पैगंबर शेख यांचे व्याख्यान झाले... तर शाहीर शितल साठे व सचिन माळी यांचा समाज प्रबोधनपर गाण्यांचा शाहिरी महाजलासा कार्यक्रम पार पडला.यावेळी शिधार्थ प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज धीवर आर पी आयचे पुरंदर तालुका युवक अध्यक्ष स्वप्नील कांबळे,मराठी पत्रकार परिषदेचे पुणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भरत निगडे,पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष राहुल शिंदे, गटशिक्षण अधिकारी पी. एस. मेमाणे यांसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे प्रस्ताविक पंकज धीवर यांनी केले.तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भरत निगडे यांनी केले.