दिवंगत शिवाजी पोमण यांच्या स्मृती दिनानिमित्त करण्यात आले अभिवादन
वाल्हे दि 3
पुरंदर तालुक्यातील वाल्हे येथे आज दिनांक ३ मार्च रोजी पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष दिवंगत शिवाजी पोमण यांना अभिवादन करण्यात आले.यावेळी वाल्हे येथील ग्रामस्थांच्यावतीने पालखी तळावर वृक्षारोपण करण्यात आले. त्याच बरोबर लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात आले. यानंतर वाल्हे ग्रामपंचायत कार्यालयात पोमण यांना अभिवादन करण्यासाठी सभा घेण्यात आली. त्याच बरोबर प्रा.डॉ.दिगंबर दुर्गाडे मित्र परिवाराच्यावतीने महर्षी वाल्मिकी विद्यालय वाल्हे येथे निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष भैय्यासाहेब खाटपे,मा. सरपंच दत्तात्रय पवार, विद्यमान सरपंच अमोल खवले, माजी.सरपंच महादेव चव्हाण, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पुरंदर तालुकाध्यक्ष संदेश पवार, कांचन निगडे, माजी ग्रामपंचायत सदस्य दीपक कुमठेकर, अमोल भुजबळ, उद्योजक सुनिलबापु पवार, अमोल भुजबळ, अभि दुर्गाडे, संतोष दुर्गाडे, सचिन बोडके, पवन दुर्गाडे, महेंद्र भुजबळ, अमित झेंडे, दिनेश पवार, रोहित चव्हाण व इतर कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.