सासवड येथे मोटर सायकलची चोरी
सासवड प्रतिनिधी दि.१८
सासवड येथील मोटर सायकलची चोरी झाल्या प्रकरणी सासवड पोलिसात फिर्याद देण्यात आली आहे. याबाबत सासवड पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 379 नुसार अज्ञात चोरट्याचा विरोधात फिर्याद देण्यात आली आहे.
याबाबत सासवड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, या बाबत आयुब मंजुरभाई बागवान, वय- 47 यांनी फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार त्यांनी सासवड येथील त्यांच्या राहत्या घरा समोर उभी केलेली त्यांची हिरो होंडा कंपनीची मोटार सायकल कोणी तरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. दिनांक १६ एप्रिल रोजी रात्री १०;३० वाजलेच्या सुमारास ही घटना घडली आहे.याबाबत सासवड पोलिसात
दिनांक १७ एप्रिल रोजी फिर्याद देण्यात आली असून सासवड पोलीस याबाबतचं अधिकचा तपास करीत आहेत.