Type Here to Get Search Results !

पुरंदरमधील प्रकल्प पळवणार असाल, तर मात्र पवारांना माफी नाही ;- विजय शिवतारे

 पुरंदरमधील प्रकल्प पळवणार असाल तर मात्र पवारांना माफी नाही . विजय शिवतारे



सासवड दि.१ 

  

      पवार कुटुंबीयांशी माझे वैयक्तिक कोणत ही वैर नाही. पण पवार कुटूंबीय पुरंदर मधील प्रकल्प पळवणार असतील तर मग मात्र मी त्यांना माफ करणार नाही.अस पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे यांनी आज दिनांक १ एप्रिल रोजी सासवड येथे पत्रकार परिषदेत म्हटलंय.


     विजय शिवतारे यांनी आज पुरंदरच्या रखडलेल्या विविध विकास प्रकल्पाबाबत जनतेला माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.यावेळी त्यांनी विद्यमान आमदार संजय जगताप यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच शरद पवारांनी पुरंदर विमानतळ बाबत घेतलेल्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केलीय. पुरंदर विमानतळाच काम केवळ बारामातिकरांमुळेच रखडलं असून त्यांना विद्यमान आमदार साथ देऊन तालुक्याशी ते गद्दारी करीत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. पुरंदर विमानतळ सुप्याला गेले तर पुरंदरची जनता बारामातीकरांना कधीच माफ करणार नाही.त्यांना उभ्या आयुष्यात पुरंदरचे वैर स्वीकारावे लागेल. असे त्यांनी म्हटले आहे.


      शिवतारे यांनी गुंजवणी प्रकल्पा बाबत आमदार संजय जगताप यांच्यावर जोरदार टीका केली आहे. जगताप यांनी गुंजवणी प्रकल्पाचं वाटोळं केल्याचे त्यांनी म्हटलंय.जगताप यांनी स्वतःच्या पैशातून एका वर्षाच्या आत गुंजवणी योजनेचे काम करण्याचं आश्वासन दिलं होत. मात्र त्यांनी तीन वर्ष हा प्रकल्प सडवला असल्याचे शिवतारे म्हणाले. आमदार संजय जगताप अपघाताने आमदार झाले असून त्यांच्यामुळे तालुक्याचे वाटोळे झाले.आजपर्यंत मी त्याला माठ्या म्हणत होतो .पण आता ते पुरंदरच्या जनतेशी गद्दारी करणारे गद्दार असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.ते म्हणतात २०२४ मध्ये पुरंदर मधून विमान उडणार पण  कसे उडणार विमान? असा प्रश्न त्यांनी आ.जगताप यांना केला आहे. विमानतळाला लोकांचा विरोध असल्याचे कारण ते देत आहेत.पण मी सांगतो आहे तुम्ही जमिनीचा भाव जाहीर करा लोक जमिनी देतील.पण जगताप यानी केंद्र सरकारला पत्र देऊन विमानतळाचा खेळखंडोबा केला आहे.

      विजय शिवतारे यांनी आज तीन वर्षा नंतर शरद पवार कुटुंबीयांवर जोरदार टीका केलीय.आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत विजय शिवतारे पूर्ण ताकदीनिशी उतरणार असल्याचे आजच्या शिवतारे यांच्या पत्रकार परिषदेस मध्ये दिसून येतंय.शिवतारे यांच्या या भूमिकेमुळे पुरंदर शिवसेनेत पुन्हा नव्याने चैतन्य निर्माण होणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies