जेजुरी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन.
शरद पवार यांच्या घरावर केलेल्या हलल्याचा करण्यात आला निषेध
जेजुरी दि.९
पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने शरद पवार यांच्या मुंबई येथील घरावर एस.टी.कामगारांनी केलेल्या दगड फेकीचा निषेध करण्यात आला.त्याच बरोबर हा हल्ला करण्याच्या पाठीमागे असलेल्या सूत्रधारांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
जेजुरी येथे आज दिनांक ९ मार्च रोजी सकाळी ११ वाजता पुरंदर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने जेजुरी नगरपरिषदेच्या कार्यालया समोर आंदोलन करून काल झालेल्या घटनेचा निषेध करण्यात आला. यावेळी पुरंदरचे माजी आमदार अशोक टेकवडे,विजय कोलते, सूदाम इंगळे,राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष माणिकराव झेंडे पाटील, जयदीप बार्भाई बापू भोर,सोमनाथ खोमणे, पुष्कराज जाधव, नारायण जाधव, सतीश वाघमारे, शांताराम घाटे, रोहिदास घाटे, संदीप राजपुरे, राजेंद्र कुंभार, वसंत सोनवणे, जालिंदर खैरे, जगताप एन डी, तानाजी जगताप, साधना दिडभाई, वंदना भोसले इत्यादी सह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.