थोपटेवाडी येथे टेम्पो मोटारसायकलचा अपघात. एक जण जखमी
नीरा दि.१८
पुरंदर तालुक्यातील पुणे पंढरपूर मार्गावर आज सकाळी टेम्पो आणि मोटार सायकल यांच्यात झालेल्या अपघातात.एकजण गंभीर जखमी झाला असून त्याला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
याबाबत प्रत्यक्षदर्शी लोकांनी दिलेली माहिती अशी की, आज दिनांक १८ एप्रिल रोजी सकाळी दहा वाजलेच्या सुमारास थोपटेवाडी फाटा येथे पुणे बाजूकडून येणारा टेम्पो क्रमांक एम एच १२ पी क्यू १९९६ व नीरा बाजूकडून पुणे बाजूकडे जाणाऱ्या मोटर सायकल क्रमांक एम एच ११ सी यू ८५८२ यांच्या मध्ये जोरदार टक्कर झाली. दोन्ही वाहनांची गती जोरदार असल्याने धडके नंतर टेम्पोने मोटर सायकलला २५ ते ३० फूट फरफटत नेले. त्यामुळे मोटारसायकल टेम्पोच्या पुढील बाजूला पूर्णपने अडकली गेली यामध्ये मोटर सायकलचे मोठे नुकसान झाले आहे. तर मोटर सायकल वरून प्रवास करणाऱ्या फलटण तालुक्यातील पाडेगाव येथील मोटारसायकल स्वार गंभीर जखमी झाला आहे. तर एक किरकोळ जखमी झाला आहे.
याबाबत अद्याप कोणीही पोलिसात फिर्याद दिली नाही. अशी माहिती नीरा पोलिसांनी दिली आ