पिंपरे येथील रेल्वे फाटकामध्ये लोहमार्ग विस्तारीकरणाचे
काम सुरु
पुणे पंढरपूर
मार्ग जेजुरी ते नीरा वाहतुकीसाठी करण्यात आला बंद.
नीरा दि.२९
पुरंदर
तालुक्यातील लोहमार्गाचे काम सुरु
असल्याने नीरा नजीक असलेल्या पिंपरे येथील
रेल्वे फाटक क्रमांक २७ मध्ये आज लोहमार्गाची दुसरी पटरी टाकण्याचे काम सुरु आहे .यासाठी पुणे
पंढरपूर मार्ग जेजुरी ते नीरा दरम्यान बंद ठेवण्यात आला आहे. त्या ऐवजी
वाहतूक जेजुरी –मोरगाव- नीरा अशी वळवण्यात आली आहे. आज दिनांक २७ एप्रिल रोजी सकाळी सहा वाजता हा मार्ग वाहतुकीसाठी
बंद करण्यात आला आहे. साधारण शुक्रवार सकाळी ६ वाजे पर्यंत हे काम सुरु राहील असा
अंदाज रेल्वे प्रशासनाकडून व्यक्त केला जात आहे . तालुक्यातील बहुतेक सर्व ठिकाणी लोहमार्गाचे दुहेरी करणाचे काम पूर्ण झाले आहे . पुणे- पंढरपूर
मार्गावर असलेल्या २७ नंबरच्या रेल्वे
फाटकावर काम अपूर्ण होते ते पूर्ण करण्यासाठी रेल्वेने हे फाटक दोन दिवस बंद ठेवले
आहे.