वाघापूर येथे तीन ठिकाणी घरफोडी
लाखोंचा मुद्देमाल केला लंपास
जेजुरी दि.२९
पुरंदर तालुक्यातील वाघापूर येथे विविध ठिकाणी झालेल्या घरफोडी मध्ये ५४४९०० रुपयाचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. याबाबत पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम ४५७ व ३८० नुसार अज्ञात चोरट्याचा विरोधात गुन्हा दखल केला आहे.
याबाबत जेजुरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, या बाबत वाघापूर येथील पंढरीनाथ रघुनाथ चव्हाण यांनी फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार दिनांक २७/४/२०२२ रोजी रात्री १० ते दिनांक २८/४/२०२२ रोजीचे ३ वाजालेच्य दरम्यानत्यांच्या घराची कडी कोणीतरी अज्ञात चोरट्याने उघडून घरातील सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत. तसेच गावांमधील विठ्ठल लक्ष्मण कुंजीर व सुभाष शंकर कुंजीर यांचाही घरात चोरी करण्यात आली आहे. यामध्ये एकूण रोख रक्कम ४० हजार सह ५४४९०० रुपयाचा मुद्देमाल चोरीला गेल्याची फिर्याद त्यांनी दिली आहे. याबाबतचं अधिकचा तपास जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गावडे करीत आहेत.