Type Here to Get Search Results !

पाच हजार रुपयाची लाच घेतल्याप्रकरणी जीएसटी अधीक्षक कुलदीप शर्माला अटक

 पाच हजार रुपयाची लाच घेतल्याप्रकरणी जीएसटी अधीक्षक कुलदीप शर्माला अटक 



बारामती प्रतिनिधी दि.२०


             बारामती येथील कंपनीचा अहवाल सकारात्मक देण्यासाठी मालकाकडून पाच हजार रुपयांची लाच मागणाऱ्या बारामती येथील केंद्रीय जीएसटी आयोगाच्या अधिक्षकला केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने मंगळवारी रंगेहात पकडले. त्याला 22 एप्रिल पर्यंत सीबीआय कोठडीत ठेवण्याचे आदेश सीबीआयचे विशेष न्यायाधीश गिरीश भालचंद्र यांनी दिला आहे. 

           कुलदीप शर्मा अशी अटक करण्यात आलेल्या केंद्रीय जीएसटी विभागाच्या अधीक्षक यांचे नाव आहे. याबाबत कंपनीच्या मालकाने सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. तक्रारदार यांच्या बारामती येथे दोन कंपन्या आहेत. त्यांचा कागदपत्रांची पडताळणी कुलदीप शर्मा करत होता. त्या कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर सकारात्मक अहवाल पाठविण्यासाठी शर्मा हा तक्रारदार आकडे पाच हजार रुपये लाचेची मागणी करत होता. परंतु तक्रारदारांना हे मान्य नसल्याने त्यांनी केंद्रीय लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार दिली. त्यानंतर सीबीआयने पडताळणी करून मंगळवारी शर्मा याला लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या बारामती येथील अंबिका नगर येथील येथील घरातून सीबीआयने महत्त्वपूर्ण कागदपत्रे जप्त केली.

      

         या प्रकरणात त्याला पुण्यातील सीबीआयच्या विशेष न्यायालयात हजर केले असता शर्मा यांच्याकडे गुन्ह्याच्या पद्धतीबाबतची चौकशी करावयाची असल्याने व त्याच्या आवाजाचे नमुने तपासणीसाठी द्यायचे असल्याने तीन दिवसांची सीबीआय कोठडी देण्याची मागणी सीबीआयच्या तपास अधिकारी पोलीस निरीक्षक शीतल शेळके यांनी केली. न्यायालयाने सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून त्याला तीन दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies