राजेवाडी येथे वीजबिल वसुलीसाठी गेलेल्या वीज वितरणाच्या कर्मचाऱ्याला मारहाण
जेजुरी दि.१
पुरंदर तालुक्यातील राजेवाडी येथे विजबिल वसुलीसाठी गेलेल्या वीज वीजवितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली. याप्रकरणी जेजुरी पोलिसात फिर्याद देण्यात आली असून पोलिसांनी या संदर्भात भारतीय दंड विधान कलम 353, 323, 504, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत जेजुरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, या संदर्भात ३८ वर्षीय विकास विनायक जाधव या वीज वितरणाच्या कर्मचाऱ्याने फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादी नुसार दिनांक ३१/३/२०२२ रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास. ते नामदेव महादेव जगताप यांचे घरातील वीज बिल वसुली साठी गेले असता, त्यांना गणेश नामदेव जगताप याने गाचांडीला धरून मारहाण केली.अशा प्रकारची फिर्याद दिली असून याबाबत अधिकचा तपास जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमेश तावस कर यांच्या मार्गदर्शना खाली हवालदार पिंगळे करीत आहेत.