पिसुर्टी येथे तीन वाहनाचा अपघात; सुदैवाने कोणतीही जीवीत हानी नाही. मात्र टँकर चालक जखमी
नीरा दि.१५
पुरंदर तालुक्यातलं पिसुर्टी येथे तीन वाहनांमध्ये झालेल्या अपघातात एकजण जखमी झाला आहे त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या बाबत वाल्हे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पुणे पंढरपूर या महा मार्गावर पिसुर्टी गावाजवळ तीन वाहनाचा अपघात झाला. पुण्याहून येणारा टँकर क्रमांक एम एच १४ जे एल ५२९६ हा निरेकडून जेजुरी कडे निघालेल्या ट्रक क्रमांक एम एच १२ एम ३९५२ ला समोर समोर धडकला यानंतर यामधून येणारी कार क्रमांक एम एच १४ जी एन ९६९१ ही पाठीमागून धडकली. त्यामध्ये कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर यामध्ये टँकर चालक जखमी झाला. अपघाता नंतर वाल्हे येथील.पोलीस कर्मचारी संदीप मदने वा त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने घटना स्थळी धाव घेऊन अपघात ग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला काढून वाहतूक सुरळीत केली आहे.