नीरा येथील जुबिलंट कामगार युनियनच्या अध्यक्षपदी सतीश काकडे यांची निवड
नीरा दि.१२
पुरंदर तालुक्यातील नीरा आणि बारामती तालुक्यातील निंबुत या गावाच्या सीमेवर असलेल्या जुबिलंट इंग्रेव्हिया कंपनीच्या कामगार युनियनच्या अध्यक्षपदी सतीश काकडे यांची आज दिनांक १२ एप्रिल रोजी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. याबाबतची घोषणा कामगार युनियनचे उपाध्यक्ष सुरेश कोरडे यांनी जाहीर केली आहे.
जुबिलंट कामगार युनियनच्या संचालक मंडळाच्या निवडणूकीचा निकाल दिनांक ६ एप्रिल रोजी जाहीर करण्यात आला होता. यामध्ये कोरडे यांच्या पॅनलचा विजय झाला होता. तर विरोधी रमेश जेधे गटाला एकही जागेवर विजय मिळवता आला नाही. यानंतर आज दिनांक १२ एप्रिल रोजी कामगार युनियनच्या संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीत निंबुत येथील सतीश काकडे यांची जुबिलंट कंपनीच्या कामगार युनियनच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.निवडीनंतर कामगारांच्यावतीने काकडे यांचे अभिनंदन करण्यात आले.