Type Here to Get Search Results !

एसटी कर्मचार्‍यांकडून पैसे घेतल्याची गुणरत्न सदावर्ते यांची कोर्टात कबुली

 एसटी कर्मचार्‍यांकडून पैसे घेतल्याची गुणरत्न सदावर्ते यांची कोर्टात कबुली



 मुंबई २०: एसटी कर्मचाऱ्यांचे वकील असलेले वकील गुणरत्न सदावर्ते यांनी आज गिरगाव कोर्टामध्ये आपण एसटी कर्मचारी कडून पैसे घेतले असल्या बाबतची कबुली दिली आहे. वकील गुनारत्न सदावर्ते यांच्या विरोधात राज्यातील विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसते आहे.


एसटी कर्मचाऱ्यांकडून गुणरत्न सदावर्ते यांनी पैसे घेतले होते आणि त्या पैशातून मालमत्ता गाडी खरेदी केली. या प्रकरणाचा तपास करण्याकरता पोलीस कोठडीची मागणी सरकारी वकिलांन तर्फे आज करण्यात आली होती. कोर्टात युक्तिवाद करत असताना विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी म्हटलं होतं की, सदावर्ते यांच्या घराची झडती घेताना त्यामध्ये महत्त्वाच्या गोष्टी सापडल्या आहेत. कागदपत्रे, रजिस्टर आणि नोटा मोजण्याचे मशीन सुद्धा यावेळी सापडून आले आहे. यावेळी विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी हर्षद मेहता प्रकरणाचा निकाल सदावर्ते यांच्या प्रकरणात रेफरन्स म्हणून वाचून दाखवला. सदावर्ते यांनी स्वतः आपली बाजू कोर्टामध्ये मांडली. सदावर्ते यांच्या बाजूने आज कोर्टात कोणीच वकीलाला नसल्याने त्यांनी आपली स्वतःची बाजू स्वतः मांडली. ते म्हणाले की, पोलीस हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत की, एक मोठा घोटाळा केला आहे. मी तीनशे पाचशे रुपये घेतले पण ते फक्त कोर्ट कामकाजा करता घेतले. तेवढे कमी पैसे कोणताच वकील घेत नाही. मी अत्यंत कमी पैशात काम केलं असं वकील गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलंय. 


      त्याचबरोबर जप्त केलेले कागद पत्र म्हणजे वकालतनामा आहे. माझ्या प्रकरणात हर्षद मेहता प्रकरणाचा दाखला दिला गेला आहे. हे अत्यंत दुःखद असून माझे सासू-सासरे स्वातंत्र्य सैनिक आहेत. गाडी घेतली त्याची नोंद आरटीओ मध्ये आहे. गाडी घेण्याकरता पैसे दिले ते ऑनलाईन दिल्याचे पुरावे आहेत. गाडी जुनी आहे .2014 ची जुनी गाडी खरेदी केली. नोटा मोजण्याचे मशीन 3000 रुपयाला घेतले. आपण मुंबईत राहतो असं त्यांनी म्हटलंय.

        सदावर्ते यांना न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर कोल्हापूर पोलिसांनी कोर्टामध्ये आपला अर्ज दाखल करून त्यांना ताब्यात देण्याची मागणी केली आहे. कोल्हापुर पोलिसांनी केलेल्या अर्जावर आता थोड्याच वेळात सुनावणी होईल 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies