विवाह समारंभात चोरट्यांनी 3,60,000 रुपयाचे दागिने केले लंपास
सासवड दि.२७
पुरंदर तालुक्यातील सासवड नजीक असलेल्या जाधवगड येथील लग्न समारंभात चोरट्यांनी तब्बल 3,60,000 रुपयाचे दागिने व भेट वस्तूंवर हात साफ केला आहे. घटनेनंतर आठ दिवसानंतर सासवड पोलिसात संशयइतांच्या विरोधात सासवड पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. याबाबत पोलिसानी भारतीय दंड विधान कलम 379 व 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत
सासवड पोलिसानी दिलेली माहिती अशी कि, या संदर्भात फिर्याद पिंपळे गुरव पुणे येथे
राहणाऱ्या ४५ वर्षीय महिला आलका सुरेश खाडे यांनी दिली आहे. यामध्ये त्यांनी विवाह
समारंभात मेकअप करण्यासाठी आलेल्या तीन मुलींवर संशय व्यक्त केला आहे .
यामध्ये
त्यांचे 1,35,000 रू किमतीची तीने तोळे वजनाची सोन्याची मोहन माळ
40,000 रू किमतीचे एक तोळा वजनाचे कानातील एक झुमके, 75,000 रुपये रोख रक्कम 1,10,000/रू किमतीचे टायटन कंपनीचे कपंनीचे घड्याळ, 10,000 रू किंमतीचे 1 घडयाळ, डी डब्लु कंपनीचे 25,000 रू किमतीचे 1 घडयाळ , रॅडो कंपनीचे 75,000 रू किंमतीचे1 घडयाळ असा 3,60,000रू किमतीचा ऐवज चोरीला गेला आहे. दिनांक १७ एप्रिल रोजी सासवड नजीक असलेल्या जाधव गड
येथे हा विवाह सोहळा संपन्न झाला होता. यानंतर दिनाक २६ एप्रिल रोजी सासवड पोलिसात
फिर्याद देण्यात आली असून सासवड पोलीस याबाबतचा तपास करीत आहेत.