Type Here to Get Search Results !

पुरंदर विमानतळाचा प्रश्न येत्या पंधरा दिवसात मार्गी लागेल : शरद पवार

 

            पुरंदर विमानतळाचा प्रश्न येत्या पंधरा दिवसात मार्गी लागेल : शरद पवार



  सुपे दि .२०

                      पुरंदर विमानतळाची बैठक येत्या पंधरा दिवसात दिल्ली येथे संरक्षण मंत्रालयात होणार असुन यासाठी देशाचे संरक्षणमंत्री , नागरी व्यवस्था मंत्री , महाराष्ट्र राज्य सरकारचे प्रतिनिधी खासदार सुप्रिया सुळे माझ्यासह बैठकीचे आयोजन करण्यात आले असुन याठिकाणी विमानतळा विषयी निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे अध्यक्ष, माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी आज सुपे येथे दिली आहे .पवार हे आज सुपे येथील विद्या प्रतिष्ठानच्या  इमारतीची कामाची पाहिणी करण्या करिता आले होते.  यावेळी येथील प्राचार्य राहुल पाटील व योगेश पाटील यांस बरोबर चर्चा करून याठिकाणी सुविधा विषयी माहिती घेत विद्या प्रतिष्ठानचा इंग्लिश मिडीअम स्कुल व कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयाचा विद्यार्थी संख्येचा आढावा घेतला , या विद्यालयाचा विद्यार्थी संख्येचा माहिती घेत दोन्ही प्राचार्याचे कौतुक केले , ग्रामीण रूग्णालयाची पाहणी व नियोजीत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागे संदर्भात माहिती शरद पवार यांनी घेतली,

 

तसेच जागेची पाहणी करून इमारत केंव्हा तयार होईल. ग्रामिण भागातील किती विद्यार्थ्यांची सोय होईल, शैक्षणिक सुविधा काय असतील, अशी बारकाईने माहिती पवार यांनी या वेळी घेतली.तसेच सुपे कारखेल, उंडवडी मार्गची व मोरगाव सुपा पाटस अष्टविनायक मार्गाची देेखिल माहििती घेतली.

 

  जनाई उपसा जलसिंचन योजनेचे पाणी नियमीत मिळते का. पाऊस झाला का. या वेळी कोणती पिके घेतली आहेत. ऊस किती लावला आहे. माझ्या वेळेचे कार्यकर्ते आता कोण कोण आहेत. त्यांची तब्येत कशी आहे. अनेक आजी- माजी व जुन्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांची नावे घेऊन त्यांनी विचारपूस केली,

 

यावेळी जेष्ठ कार्यकर्ते संजय दरेकर , बबननाना बोरकर , बापुराव चांदगुडे , नंदाताई खैरे ,शंकरराव चांदगुडे, सुपे गावचे उपसरपंच मल्हारी खैरे ,शौकत कोतवाल आदी जेष्ठ मान्यवर उपस्थिती होते .

त्याच बरोबर  राष्ट्रवादी कॉग्रेसचे बारामती तालुका अध्यक्ष संभाजी होळकर , विद्या प्रतिष्ठानचे विश्र्वत किरण गुजर , माजी नगराध्यक्ष सदाशिव सातव , माजी सभापती  निता बारवकर , पोपट पानसरे ,सपे ग्रामपंचायत सदस्य मुनीर डफेदार , संपत जगताप, अशोक लोणकर, राजकुमार लव्हे ,रोहन सरोदे इत्यादींसह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies