Type Here to Get Search Results !

शाळा व्यवस्थापन समिती सक्षम करावी : केंद्रप्रमुख प्रतापराव मेमाणे

 शाळा व्यवस्थापन समिती सक्षम करावी : केंद्रप्रमुख प्रतापराव मेमाणे



पुरंदर तालुक्यात शाळा व्यवस्थापन समिती सक्षमीकरण प्रशिक्षण उत्साहात संपन्न.


गराडे दि.११ (वार्ताहर):-


शाळा व्यवस्थापन समितीचे सक्षमीकरण झाल्यास शैक्षणिक गुणवत्ता वाढीला चालना मिळेल, असे प्रतिपादन दिवे केंद्राच्या केंद्रप्रमुख प्रतापराव मेमाणे यांनी केले.

     दिनांक 11 मार्च 2022 रोजी दिवे जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळेत केंद्रस्तरीय शाळा व्यवस्थापन समिती सक्षमीकरण प्रशिक्षण संपन्न झाले.त्याचप्रमाणे भोर तालुक्यात विविध केंद्रात उत्साहात प्रशिक्षण संपन्न झाले.त्या वेळेस श्री. मेमाणे बोलत होते.

     यावेळी दिवे ग्रामपंचायत सदस्य भारती राजू आढागळे आदींसह विविध शाळांचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते.

     या प्रशिक्षणात तज्ञ मार्गदर्शक गोरख मेमाणे व राजेंद्र गाढवे यांनी मार्गदर्शन केले. 

     यावेळी राजश्री मोरे, वनिता माळवदकर, सविता जगताप ,संजना गोसावी, विशाखा मेमाणे, मनिषा सुरवसे, रंजना ओगले, सुवर्णा गुरव, मंगल शेळके, साधना गवळी, निशा वढणे, सुकुमारी निकम संगीता कुदळ, भाऊसाहेब जगताप सुनील लोणकर, उदय पोमण उज्वला ठवाळ आदी शिक्षक वृंद उपस्थित होते.

     याप्रसंगी उभारलेल्या शैक्षणिक विचारमंच कोपरा उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच शिक्षकांनी शैक्षणिक गट कार्यात सहभाग घेऊन सादरीकरण केले.

    पालकांनी आपल्या मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेतच घालावे', असे आवाहन विजय कोंढाळकर यांनी केले.

     पालक, विद्यार्थी, शिक्षक या तीन दुव्यांमध्ये असणारा समन्वयच मुलांच्या शैक्षणिक प्रगती साधण्यामध्ये उपयोगी ठरणार आहे', असे प्रतिपादन भारत मोरे यांनी केले.

      केंद्रप्रमुख प्रतापराव मेमाणे पुढे म्हणाले की, 'शाळा व्यवस्थापन समिती ही प्रत्येक गावातील महत्त्वाची समिती असून तिचे सक्षमीकरण झाले तर गावातील शाळेच्या गुणवत्ता वाढीला नक्कीच चालना मिळेल. शिक्षकांनी आपली मार्गदर्शकाची भूमिका चोख बजावण्यात कोठेही कमी पडू नये.'

   प्रास्ताविक भाग्यश्री कुंजीर केले. सूत्रसंचालन उदय पोमण केले.तर भाऊसाहेब जगताप यांनी आभार मानले.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies