क्षयरोग रोगावर वेळीच उपचार घ्या.आणि भारतातून क्षयरोग हद्दपार करा.: बाळासाहेब भंडलकर
नीरा दि.२३
क्षयरोग अर्थात टीबी हा आजार पूर्णपणे बरा होणार असून वेळीच उपचार घेतले तर तो लवकर पूर्णपणे बरा होतो. त्यामुळे लोकांनी बाबत घाबरून न जाता वेळीच उपचार करून घ्यावेत आणि आपला देश क्षयरोग मुक्त देश करून या. क्षय रोगाला आपण या देशातून हद्दपार करूया. असे आवाहन निरा येथील आरोग्य सहाय्यक बापूसाहेब भंडलकर यांनी केले आहे.
नीरा (ता.पुरंदर) येथे जगातीक क्षयरोग दिनानिमित्त क्षयरोग जनजागृती अभियान राबवण्यात येत आहे.आज दि.२३ रोजी नीरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लोकांना क्षयरोग बाबत माहिती देण्यात आली.यावेळी क्षयरोग तालुका निरीक्षक फिरोज महात,आरोग्य सहिका सत्यभामा म्हेत्रे, आरोग्य सहायक बेबी तांबे आशास्वयंसेविका आशा सुर्यवंशी,स्मिता टिके इत्यादीसह ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना आरोग्य सहाय्यक भंडलकर म्हणाले की,आज आपण क्षयरोगावर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात यशस्वी झालो आहेत.ज्या प्रमाणे आपण पोलिओला भारतातून हद्दपार केले आहे. त्याच प्रमाणे टी.बी. अर्थात क्षय रोगला ही हद्दपार करूयात. क्षय रोग नियंत्रणात आपण मोठ्या प्रमाणात यश मिळवले आहे.आता आपल्याकडील क्ष्यारोगाच प्रमाण नगण्य आहे.मात्र आपल्याकडे क्षयरोगाचा एकही बाधित रुग्ण ठेवायचा नाही.त्याच्यावर उपचार करून त्याला पूर्ण बरा करायचे आहे.शासन अशा रुग्णावर मोफत उपचार करीत आहे.त्यामूळे ज्यांना क्षयरोगाची लक्षणे दिसत आहेत, त्यांनी तातडीने त्यावर उपचार घ्यावेत. प्राथमिक आरोग्य केंद्र,ग्रामीण रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालयात यावर मोफत उपचार केले जात आहेत.१५ दिवसा पेक्षा जास्त दिवस खोकला असेल तर त्या लोकांनी क्षयरोग संदर्भात चाचणी करून घ्यावी.वेळीच रोगाचे निदान झाले तर लवकर उपचार करून रोग ही लवकर बरा होईल.