जेजुरी येथील अल्पवयीन मुलीला फुस लाऊन पळवले
जेजुरी दि ८
पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथील अल्पवयीन मुलीला फुस लाऊन पळवून नेल्या प्रकरणी जेजुरी पोलिसात फिर्याद देण्यात आली आहे.याबाबत जेजुरी पोलिसात भारतीय दंड विधान कलम 363 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत जेजुरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,याबाबत सध्या जेजुरी येथे राहणारे व मूळचे उत्तर प्रदेश येथील रहिवाशी असलेले मुलीच्या पालकांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानीं दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी योगेश मोहन आवटे रा. बरसुळेनगर जेजुरी ता.पुरंदर जि.पुणे याने त्यांच्या अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेले आहे.याबाबतचं अधिकचा तपास पोलीस निरीक्षक उमेश तावसकार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक खांडे करीत आहेत.