नीरा येथे आढळला अनोळखी पुरूषाचा मृतदेह
नीरा दि.७
पुरंदर तालुक्यातील नीरा येथे एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला असल्याची माहिती जेजुरी पोलीस स्टेशनच्या वतीने देण्यात आली आहे. या अनोळखी पुरुषाची ओळख पटवण्यात अजून पोलिसांना यश आले नसून कोणाच्या व्यक्ती मिसिंग असल्यास जेजुरी पोलिसाशी संपर्क साधण्याचे आवाहन नीरा पोलीस दुर्क्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक कैलास गोत पगार यानी केले आहे.
याबाबत जेजुरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की दिनांक ६ /२ /२०२२ रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास हा मृतदेह आढळून आला आहे. याबाबतची खबर पोलीस पाटील राजेंद्र भास्कर यांनी नीरा पोलिस दूर्क्षेत्रात दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार निरा येथील वार्ड नंबर 2 मधील धनंजय काकडे यांच्या जागेमध्ये अनोळख्या पुरुषाचा मृतदेह असल्याचे धनंजय काकडे यांनी पोलीस पाटील राजेंद्र भास्कर यांना कळविले होते. त्यानुसार त्यांनी तेथे जाऊन खात्री केली असता तेथे 55 ते 60 वर्षे वयाचा अनोळखी पुरुष मृतावस्थेत आढळून आला.यानंतर त्यांनी याबाबतची खबर नीरा दुरक्षेत्रत पोलिसांना दिली. यासंदर्भात पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून याबाबतचा अधिक तपास जेजुरी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमेश तावकसर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक एच एस करे करत आहेत.या अनोळखी पुरुषाची ओळख पटवण्यासाठी लोकांनी पुढे यावे असे आवाहन नीरा येथील पोलिस उपनिरीक्षक कैलास गोतपागर यांनी आज दिनांक ७ मार्च रोजी केले आहे.
या मृत व्यक्तीने पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि निळ्या रंगाची पॅंट त्याचबरोबर गळ्यात निळ्या रंगाचा रूमाल केल्याचे दिसून येत असून याचा वय अंदाजे 55 ते 60 वर्षे आहे असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे