Type Here to Get Search Results !

नीरा येथील १२ वीच्या परीक्षा केंद्रावर उपसरपंच राजेश काकडे यांनी केले विद्यार्थ्यांचे स्वागत.

 नीरा येथील १२ वीच्या परीक्षा केंद्रावर उपसरपंच राजेश काकडे यांनी केले विद्यार्थ्यांचे स्वागत. 



निर्भयपने, विनाकॉपी पेपर लिहिण्याचा दिला संदेश 

नीरा दि. ४


       नीरा (ता.पुरंदर) येथील  १२ विच्या परीक्षा केंद्रावर निरागावचे उपसरपंच व पुरंदरच्या समितीचे माजी उपसभापती लक्ष्मणराव चव्हाण यांनी  १२ वीच्या  विद्यार्थ्यांचे  गुलाब पुष्प बदेऊन स्वागत केले. दोन वर्षानंतर  विध्यार्थी बोर्डाच्या परीक्षेला  सामोरे जात आहेत.त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या शंका मनात न ठेवता विद्यार्थ्यांनी निर्भयपने व गैरमार्गाचा वापर नकरता परीक्षा द्यावी असे आवाहन उपसरपंच  राजेश काकडे यांनी यावेळी केले.




   नीरा येथील महात्मा गांधी विद्यालय व किलाचंद कनिष्ठ विद्यालय या  ठिकाणी असलेल्या  परीक्षा केंद्रावर२२३ विध्यार्थी परीक्षा देत आहेत.तर सौ.लीलावती  रिखावलाल शहा कन्या शाळेत असलेल्या  परीक्षा केंद्रावर  २३  विध्यर्थिनी परीक्षा देत आहेत.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षानंतर प्रथमच ऑफलाईन परीक्षा होते आहे.त्यामूळे दोन्ही केंद्रावर मास्क,  सॅनिटायझर, सोशल डिस्टन्स इत्यादी नियमांचे पालन करून ही परीक्षा घेतली जाते आहे. आज सकाळी साडेदहा वाजता  उपसरपंच राजेश काकडे, पुरंदर पंचायत समितीचे माजी उपसभापती लक्ष्मणराव चव्हाण यांनी या विद्यार्थ्यांचे स्वागत केले. यावेळी नीरा ग्रामपंचायतीचे सदस्य अनिल चव्हाण, संदीप धायगुडे, दक्षता कमिटीचे  सदस्य राहुल शिंदे, भरत निगडे, मोहम्मद घोष आतार निरेचे  पोलीस पाटील राजेंद्र भास्कर पोलीस कर्मचारी दोन्ही कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक गोरख थिटे,निवेदिता  पासलकर, पर्यवेक्षक जयंत कुमार दाभाडे,व त्याचबरोबर शिक्षक,होमगार्ड पोलीस कर्मचारी उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies