चिव्हेवाडी येथे एकाची झाडाला
फाशी घेऊन आत्महत्या
सासवड दि.3
पुरंदर तालुक्यातील चिव्हेवाडी एका ५५ वर्षीय व्यक्तीने झाडाला फाशी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली असून यासंदर्भात मयत व्यक्तीच्या पुतण्याने सासवड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे .
सासवड पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार मयत दिलीप भिकू वाशिलकर वय 55 वर्षे रा.चिव्हेवाडी चिव्हेवाडी त्यांना दारू पिण्याचे व्यसन होते दि.03/03/2022 रोजी सकाळी 08.00 वा.चे सुमारास फिर्यादी यांच्या चुलती मंदा दिलीप वाशिलकर या फिर्यादीच्या घरी आल्या व म्हणाल्या की, दिलीप रात्री खुप दारू पिला होता. सकाळी आम्ही उठलो तेव्हा तो घरात नव्हता. तो कुठे तरी निघून गेला आहे. तेव्हा फिर्यादी व गावातील लोकांनी त्यांचा गावात व आजुबाजूला शोध घेतला. खळयाचे नाकर येथून गावातील मुलांनी आवाज देऊन सांगितले की, दिलीप याने झाडाला फाशी घेतलेली आहे. तेव्हा फिर्यादी यांनी तेथे जावून पाहिले तेव्हा त्यांचे चुलते दिलीप यांनी उंबराचे झाडाच्या फांदिला रस्सीने फाशी घेतलेला दिसले . सदर बाबत त्यांनी सासवड पोलीस स्टेशन येथे फोन करून कळविले.त्यानंतर सासवड पोलीस घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी मयत दिलीप भिकु वाशिलकर यांचे शव अँम्बुलन्स मध्ये घेवून पुढील कार्यवाही करीता जेजुरी ग्रामीण रूग्णालय येथे घेवून गेले आहेत. सासवड पोलिस पुढील तपास करीत आहेत .