कोथळे गावाचे सरपंच शहाजी जगताप यांना जिल्हा परिषदेचा आदर्श सरपंच पुरस्कार
जेजुरी वार्ताहर दि २० पुरंदर तालुक्यातील कोथळे गावचे सरपंच शहाजी सदशिव जगताप यांना त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने आदर्श सरपंच पुरस्कार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे,उपाध्यक्ष रणजीत शिवतरे यांच्या हस्ते देवून सन्मानित करण्यात आले.
यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य प्रमोद काकडे,वीरधवल जगदाळे, कोथळे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच वंदना जगताप,सदस्य अभिजित जगताप, बापुसो जगताप,नीरा कृषी उत्पन्न समितीचे संचालक अड धनंजय भोईटे, माजी सरपंच वसंत आबा जगताप,पोलीस पाटील आबा भंडलकर,शशिकांत जगताप,सुहास जगताप,अमोल जगताप,वैभव जगताप,सौरभ जगताप,संजय काकडे,भारत काकडे ,ग्रामसेवक पिसे आदी उपस्थित होते.
पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप तसेच भारत सरकारचे आयडीएस अधिकारी राजेंद्र जगताप यांच्या नेतृत्वाखाली गेली चार वर्षात कोथळे गावात छत्रपती शिवरायांचा पुतळा,सीसीटीव्ही यंत्रणा ,गायराना वृक्ष लागवड, पिण्याची पाणी योजना,स्मशानभूमी,दशक्रियाविधी घाट,ओढा खोलीकरण,बंधारे,दफनभूमी,गावात अंतर्गतरस्ते,ग्राम्पंचायत इमारत,शाळांची दुरुस्ती,मंदिरांचा जीर्नोधार अशी सुमारे साडे तीन कोटी रुपयांची विकास कामे करण्यात आली असून गावाचा सर्वांगीण विकास हे आपले ध्येय असल्याचे सरपंच शहाजी जगताप यांनी सांगितले.