पुरंदर पंचायत समितीच्यावतीने जेऊर येथील भजनी मंडळास साहित्याचे वाटप
नीरा दि. ११
पुरंदर तालुक्यातील जेऊर येथे (दि.११)पुरंदर पंचायत समितीच्या वतीने जेऊर येथील भजनी मंडळास साहित्याचे वाटप करण्यात आले जिल्हापरिषद सदस्य मा. श्री दिलीप आबा यादव यांच्या हस्ते व पुरंदर पंचायत समितीच्या सभापती नलिनी लोळे यांच्या उपस्थितीत हे वाटप करण्यात आले.
जेऊर येथील श्री गणेश भजनी मंडळ जेऊर हे पुणे जिल्ह्यातील विविध भजन स्पर्धेत सहभागी होत असतात . यावर्षीही श्री गणेश भजनी मंडळ जेऊर यांनी चिंचवड येथील जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळविला आहे. पुरंदर तालुक्यातील विविध ठिकाणी भजन स्पर्धेत देखील त्यांचा सहभाग असतो. यावेळी दिलीप यादव यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला व श्री गणेश भजनी मंडळ जेऊर यांना हामोनियम, मृदंग, विना, १० टाळ इत्यादी साहित्य देऊन संन्मान केला.
यावेळी, पुरंदर पंचायत समितीच्या सभापती नलिनीताई लोळे , उद्योजक हरिभाऊ लोळे, काका राऊत,नितीन जगताप,श्री गणेश भजनी मंडळाचे सदस्य मनोहर धुमाळ, दत्ता धुमाळ,चंद्रकांत धुमाळ,प्रतीक धुमाळ,प्रकाश धुमाळ, दत्तात्रय धुमाळ,कुंडलिक धुमाळ,जालिंदर कुंभार,सुहास धुमाळ,रमेश थोपटे,वाघांबर काळे, इत्यादी उपस्थित होते.