प्रत्येक पत्रकाराने आरोग्य विमा घ्यायलाच हवा शिवरी येथे खा.सुप्रिया सुळे यांचे प्रतिपादन
शिवरी दि. २
पुरंदर तालुक्यातील मराठी पत्रकार परिषदेच्या २७ पत्रकारांचा आरोग्य विमा सुदामा आप्पा मित्र परिवाराच्यावतीने घेण्यात आला आहे . दिनांक १ मार्च रोजी बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या विमाचे वाटप करण्यात आले. पत्रकारांचा आरोग्य विमा उतरवल्या बद्दल सुळे यांनी समाधान व्यक्त करत इंगळे परिवाराचे आभार मानले.
यावेळी बोलताना सुळे म्हणाल्या की,पत्रकारांना अनेक अडचणीतून काम करावे लागते.अशावेळी त्यांचा आरोग्याकडे दुर्लक्ष होत. त्यामुळे त्यांना आरोग्य विमा असायलाच हवा.पत्रकारांनी कोरोनाच्या काळामध्ये आपल्या जीवाची बाजी लावून रस्त्यावर उतरून लोकांच्या समस्या आपल्या समोर मांडल्या. पत्रकारांच्या विविध समस्यांमध्ये त्याच्य विम्याच विषय होताच. त्याच अनुषंगाने पुरंदर तालुका पत्रकार संघातील पत्रकारांची आरोग्य विमा पॉलिसी घेण्याचा निर्णय सुदामआप्पा इंगळे मित्रपरिवाराने घेतला.माजी जिल्हा परिषद सदस्य सुदामआप्पा इंगळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ही पॉलिसी घेतल्याने आपणास समाधान वाटतयं असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.
या वेळीं झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पुरंदरचे आमदार संजय जगताप होते. जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, माणिकराव झेंडे, नंदुकाका जगताप, बाळासाहेब कामथे, शामकांत भिंताडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न झाला.
सुदाम इंगळे मित्रपरिवार यांच्यामार्फत पुरंदर तालुक्यातील मराठी पत्रकार परिषद मुंबईचे सदस्य असलेल्या पुरंदर तालुक्यातील २७ पत्रकारांचा आरोग्य विमा उतरवण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष योगेश कामथे यांनी केले. सुत्रसंचलन निखिल जगताप यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष दत्तानाना भोंगळे, उपाध्यक्ष प्रवीण नवले, सचिव अमोल बनकर, कार्यकारणी सदस्य निखिल जगताप, संतोष डुबल, विशाल फडतरे, संतोष जंगम, हनुमंत वाबळे, अक्षय कोलते आदींनी परिश्रम घेतले. यावेळी पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष सुनील लोणकर, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे बाळासाहेब काळे,सोशल मीडिया जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिंदे,परिषदेचे जिल्हा प्रशीद्दी प्रमुख भरत निगडे इत्यादी उपस्थित होते