विज्ञानाच्या नवनवीन उपक्रमाची निर्मिती विज्ञान प्रदर्शनातूनच होते : डॉ. राम रणनवरे.
ज्योतिर्लींग इंग्लिश मेडियम स्कुलमध्ये विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन
नीरा : दि.४
विद्यार्थ्यांच्यात वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण व्हावा तसेच संशोधक वृत्तीला चालना मिळावी याकरिता शालेय जिवनात विज्ञान प्रदर्शन गरजेचे आहे. विज्ञानाच्या नवनवीन उपक्रमाची निर्मिती अशा विज्ञान प्रदर्शनातूनच होते असते, असे मत नीरा मेडिकल असोशीयनचे अध्यक्ष डॉ. राम रणनवरे यांनी व्यक्त केले.
ज्ञान विज्ञान आणि व्यक्तीमत्व विकास प्रतिष्ठान संचलित ज्योतिर्लींग इंग्लिश मेडियम स्कुल नीरा (ता.पुरंदर) मध्ये शुक्रवार (दि.०४) रोजी विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटना वेळी डॉ. राम रणनवरे बोलत होते. यावेळी डॉ. ममता पळसे, ज्ञान विज्ञान आणि व्यक्तीमत्व विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. मच्छिंद्र मेरगळ, दिपाली मेरगळ, सुनील मेरगळ, मुख्याध्यापिका कावेरी निगडे, अनिता राक्षे, सहशिक्षीका किर्ती येळे, रुपाली फरांदे, धनश्री देशपांडे, मोहिनी शिंदे, नंदीनी देशमुख, वर्षा काकडे आदिंनी विज्ञान प्रदर्शन यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.
यावेळी विज्ञानाचे विविध उपकरणे तयार करून इयत्ता १ ली ते १० पर्यंत सुमारे १५० विद्यार्थ्यी सहभागी झाले होते. सौरउर्जा, पवनउर्जा, उर्जाबचत, पाणी बचतीची साधने, गणितीय उपकरणे, वाहतूकीची पर्यावरणिय साधने, पर्यावरणीय सापशिडी, प्रदूषण निर्मुलन यांवर आधारित विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या उपकरणांनी प्रमुख पाहुण्यांचे तसेच उपस्थितांचे लक्ष वेधले.