रानमळा येथे घरात घुसून विवाहित महिलेचा विनयभंग
जेजुरी दि. ८
पुरंदर तालुक्यातील रानमळा येथे घरात घुसून विवाहित महिलेचा विनयभंग प्रकरणी जेजुरी पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
या संदर्भात जेजुरी पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम354,452 नुसार गुन्हा दाखल आहे .
याबाबत जेजुरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,पुरंदर तालुक्यातील रानमळा येथे राहणाऱ्या एका ३२ वर्षीय विवाहित महिलेने या बाबत फिर्याद दिली आहे. संबधित महिला. दिनांक 6/3/2022 रोजी रात्री 9 वाजता घरात असताना आरोपी अतुल नामदेव कुदळे राहणार समर्थ नगर हिंगणे आळी वडगाव धायरी पुणे हा घरात आला व त्याने महिलेशी असभ्य वर्तन करून तिचा विनयभंग केला. अशा प्रकारची फिर्याद देण्यात आळी आहे.पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक लोंढे करीत आहेत.