जेजुरीतल थकीत घरपट्टी, पाणीपट्टीवर आता दरमहा दोन टक्के दंड आकाराला जाणार : नगरपरिषदेची माहिती.
जेजुरी दि.३०
पुरंदर तालुक्यातील जेजुरी नगर परिषदेच्या वतीने एक एप्रिलपासून थकीत मिळकत करा वर दरमहा दोन टक्के दंड आकारण्यात येणार असल्याची माहिती नगरपरिषदेच्यावतीने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे. याबाबतचे एक निवेदन नगरपरिषदेच्यावतीने प्रसिद्धीसाठी आज दिनांक ३० मार्च रोजी देण्यात आलंय
जेजुरी नगर परिषदेच्यावतीने वसुलीची मोहीम सध्या सुरू आहे. मात्र अनेक मिळकतदार ही घरपट्टी भरण्यास टाळाटाळ करत आहेत. लोकांनी घरपट्टी पाणीपट्टी व इतर कर भरून सहकार्य करण्याचे आवाहन मुख्याधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे. मात्र तरी देखील लोक घरपट्टी भरत नाहीत. काही लोकांचे तीन ते चार वर्षांपासून थकीत आहे. त्यामुळे दिनांक एक एप्रिल २०२२ पासून या थकित घरपट्टीचे रकमेवर दोन टक्के दरमहा दंड लावण्याचा निर्णय नगरपरिषदेच्यावतीने घेण्यात आला आहे. नगरपरिषद नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम १६० अ नुसार हा दंड आकारण्यात येणार असून लोकांनी तातडीने घरपट्टी भरून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.