ग्रामस्वच्छता केवळ ग्रामपंचायतीची जबाबदारी नाही तर ती प्रत्येकाची जबदारी आहे.:- तेजश्री काकडे
नीरा दि.३
गाव स्वच्छ ठेवण्याचं काम ग्रामपंचायतीचे असले तरी सार्वजनिक स्वच्छ्ता ही गावातील प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे.आणि म्हणूनच आपला गाव कसा स्वच्छ ठेवता येईल याची जबाबदारी प्रत्येकाने घ्यायला हवी. प्रत्येकाने वैयक्तिक स्वच्छते बाबरोबरच सार्वजनिक स्वच्छता राखायला हवी. असे आवाहन निरच्या सरपंच तेजश्री काकडे व उपसरपंच राजेश काकडे यांनी केले आहे.
नीरा येथे आज (दि.३) रोजी ग्रामपंचायतचेवतीने १५ वा वित्त आयोग व स्वच्छ भारत मिशन अंतर्गत बांधण्यात आलेल्या सार्वजनिक सौचालयाचे लोकार्पण करण्यात आले.यावेळी सरपंच तेजश्री काकडे व उपसरपंच
उपसरपंच राजेश काकडे यांनी सार्वजनिक स्वच्छता रखण्याबाबत नागरिकांना आवाहन केले.याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य अनिल चव्हाण,प्रमोद काकडे, सारिका काकडे,राधा माने, वैशाली काळे,संदीप धायगुडे,आप्पा चव्हाण, अभिषेक भालेराव, शशिकला शिंदे वर्षा जावळे,जबिन डांगे,मुन्ना डांगे,प्रियांका झुंजार,माजी उपसरपंच कुमार मोरे, सुदाम बंडगर, विजू शिंदे अड.विजय भालेराव, दादा गायकवाड, यांसह अनेक मान्यवर
उपस्थित होते.यावेळी अनिल चव्हाण, मुन्ना डांगे यांनी मनोगत व्यक्त केले.