शेतीचे
वीज बिल माफीसाठी भाजपचे जेजुरी येथे आंदोलन: पुणे पंढरपूर मार्गावर भाजप कार्यकर्त्यांनी
मांडला ठिय्या.
जेजुरी
दि.२
पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथे आज दिनांक 2 मार्च रोजी रस्ता रोको करीत आंदोलन करण्यात आले. कोरोना काळात शेतकर्यांचे
मोठे नुकसान झाले. शेतात उत्पादित केलेला
शेतमाल फेकून द्यावा लागला. सरकार शेतकऱ्यांची
वीज तोडते आहे आणि शेतकर्याची ७६ हजार रुपयाची थकबाकी असल्याच
सांगतय. पण हे चूक आहे सरकार खोत बोलत आहे. न्यायालासाच्या समितीने दिलेल्या अहवालानुसार महा वितारांनेच शेतकऱ्यांना आजून परतावा दिला नाही.कोणत्याही
परिस्थितीत शेतकर्याची वीज तोडू नका अस आवाहन भाजपचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष जालिंदर कामठे
यांनी केले आहे. या उपर ही कारवाई केली तर आमच्या रोषाला सामोरे जावे लागेल व हे आंदोलन अधिक तीव्र केले जाईल असा
इशाराही त्यांनी दिला आहे.