कोरोना काळात पोलीस पाटलांचे मोलाच सहकार्य मिळाले : तहसीलदार रुपाली
सरनोबत
सासवड दि.२५
देशात
कोरोनाने थैमान घातले असताना राज्यात पोलीस
पाटलांनी मोलाच सहकार्य केले. पोलीस पाटील महसूल विभागाकडून इतर वेळी दुर्लक्षित
राहतो. पण महामारीच्या काळात पोलीस पाटलांनी केलेले काम वाखाणण्या जोगे आहे .असे
म्हणत पुरंदरच्या तहसीलदार रुपाली सरनोबत यांनी पोलीस पाटलांच्या कामाचे कौतुक
केले.
सासवड ता. पुरंदर येथे आज
पुरंदर तालुका पोलीस पाटील संघटनेच्यावतीने संघटनेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा
पदग्रहण समारंभ व पोलीस पाटील मार्गदर्शन शिबिराचे आयीओजन करण्यात आले होते यावेळी
तहसीलदार रुपाली सरनोबत बोलत होत्या.या प्रसंगी भोर उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय
पाटील,जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस
निरीक्षक उमेश तावसकर, सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप ,पोलीस पाटील
संघाचे राज्य अध्यक्ष अध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील ,पश्चिम विभाग अध्यक्ष दादा काळभोर, पुणे जिल्हा अध्यक्ष साहेबराव
राळे पाटील, पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडी अध्यक्ष तृप्ती मांडेकर, पुणे जिल्हा
कार्याध्यक्ष विजयराव कुंजीर, पुणे जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्ष हर्षदा सपकाळ, पुरंदर तालुका अध्यक्ष उमेश तळेकर, उपाध्यक्ष
मोहन इंगळे, त्याच बरोबर नवनिर्वाचित कार्यकारिणी, विविध तालुक्यातून आलेले पदाधिकारी उपस्थित
होते.
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील, दादा काळभोर, साहेबराव राळे पाटील, तृप्ती मांडेकर, उमेश तळेकर इत्यादींनी आले मनोगत व्यक्त केले.राज्याचे अध्यक्ष बालासाहेब शिंदे पाटील म्हणाले की, पोलीस पाटील गावपातळीवर काम करतो त्याला अनेक संकटांचा सामना करावा लागतो.अनेकदा विना कारण पूर्व ग्रह धरून पोलीस पाटलाविरोधात तक्रारी केल्या जातात. अशा वेळी प्रशासनाने पोलीस पाटलाला त्याची बाजू मांडायची संधी द्यायला हवी.त्याच बरोबर प्रशासनाने देखील त्याच्या पाठीशी खंबीर उभे रहायला हवे.तरच गाव पातळीवर पोलीस पाटील खंभीर पणे काम करू शकेल.संघटनेच्या माघ्यमातून राज्य सरकारकडे पाठ पुरावा करून अनेक प्रश्न सोडवण्यात यश आले आहे.पोलीस पाटलांनी संघटीत रहायला हवे.त्याच बरोबर प्रशासकीय कामाची जबाबदारी पूर्ण करायला हवी. कार्यक्रम पारपाडण्यासाठी पोलीस पाटील राजेंद्र भास्कर,कुंडलिक तांबे,राहुल शिंदे,दिनेश जाधव,दीपक जाधव,दिनेश खोमणे,प्रियांका चव्हाण,अमोल लोळे,अक्षय शिदे,विनायक गायकवाड,सुरज जगदाळे,कल्पेश वाडकर,विद्या ताकवले, आरती जगताप,इत्यादींनी परिश्रम घेतले.
यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सारिका सावंत,श्रीकांत
राणे,मोहन इंगळे, यानी केले प्रास्तविक उमेश तळेकर यांनी तर आभार सचिन दळवी यांनी मानले
कोरोन काळात कोरोनामुळे
मरण पावलेल्या पाटलांना विमा द्या
कोरोना काळात कर्तव्य
बजावत असताना अनेक पोलीस पाटलांचा कोरोन मुळे मृतू झाला.या पैकी शासनाने फक्त सहा
लोकांनाच ५० लाखाचा विमा दिला मात्र अजूनही ४० हून जास्त पाटलांच्या वारसांना विमा
रक्कम मिळाली नाही. शासनाने पोलीस पाटलांना फ्रंट लाईन वर्कारचा दर्जा दिला आणि
काम करायला लावले पाटलांनी संकट पाहून स्वतःला झोकून देऊन काम केले. मात्र आता
कोतोनात मृतू पावलेल्या लोकांना शासन विमा देताना दिरंगाई करीत आहे. शासनाने याकडे
लक्ष द्यावे.अन्यथा वेळ पडली तर आम्ही रस्त्यावर येवू असा इशारा संघटनेचे
राज्याध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिला आहे