आल्याचे उपयोग
दररोजाच्या स्वयपाकात आपल्याकडे आल्याचा नेहमीच
वापरले जाते.त्याचा आपल्या शरीराला खूप चांगला उपयोग होतो. मराठीत आपण आले म्हणतो त्याला हिंदीत अद्रक
म्हणतात तर याला इंग्रजीत 'जिंजर'
असे
नाव आहे. आयुर्वेदात आपल्याला विश्वभेजक, विश्व-औषधी असे पर्यायी नाव दिलेले आहे. यावरून
त्याच्या औषधी गुणधर्माची कल्पना येईल. आल्याची साल काढून उन्हात वाळविल्यावर ती सुंठ
तयार होते. बऱ्याचशा आयुर्वेदीक औषंधामध्ये सुंठीचा वापर केला जातो. तसेच काही
औषधींना आल्याचा रसाचाही वापर केला जातो. भारता बाहेरील चीन व ग्रीक
ग्रंथांमध्येही आल्याचा उल्लेख आढळतो. परदेशात आल्याचा आहारात उपयोग न करता केवळ औषधी म्हणूनच
उपयोग केलेला आढळतो. ग्रीक फिजिशियन गॅलेन यानेही आल्याचा उल्लेख केलेला आढळतो.
गॅलेन याने पक्षघातासाठी आल्याचा वापर केला होता. आल्यासंबंधीचे आयुर्वेदात
महत्त्वाचे विचार मांडलेले आहेत.
आले चवीला तिखट असून, उष्ण द्रव्य आहे. लहान मुलांमध्ये सर्दी पड़शावर कपाळ, छाती तसेच नाकाच्या भोवती आल्याच्या लेपाने अपेक्षित फायदा होतो. घाम फार येणे, घामाला दुर्गंधी असणे यासाठी सुंठीचा लेप लावतात, आले, सुंठ, वात, व्याधींवर उत्तम औषध आहे. सेवनाने रक्तवाहिन्यांना बळ मिळते. वेदना कमी होतात. आमवात, सांधेदुखी या आजारांमध्ये सुंठीचा वापर फारच महत्वाचा समजला जातो. या आजारांमध्ये सुंठीचा बाहेरून लेप लावल्यास सूज आणि वेदना कमी होतात.
आले, सुंठ याचा उपयोग पचन संस्थेच्या कार्यात महत्वाची भूमिका बजावते. अरुची, अग्निमांद्य, मळमळ, अजीर्ण, भूक न लागणे, अपचन, गॅस धरणे, उदरशूळ,आदी विकारांमध्ये याचा अतिशय चांगला लाभ होतो. आल्याचा तिखट रस आणि उष्ण गुणधर्म याद्वारे श्वसनसंस्थेवर चांगला परिणाम होतो. गुळ आणि सुंठ एक करून घेतल्यास सर्दी पडसे, अरुची कमी होते. स्थूल स्त्रियांना मासिक पाळीच्या वेळी कमी रक्तस्त्राव व वेदनायुक्त होत असेल त्यांनी नियमित आल्याचा काढा (एक कप) सकाळी घ्यावा. आल्यामध्ये प्रामुख्याने उडनशील तेल, फेनॉल जास्त प्रमाणात आहेत. आल्यातील तिखट रस प्रामुख्याने जिंजीरॉल या घटकद्रव्याच्या असून त्याद्वारे औषधी परिणाम घडून येतात. जिंजीरॉल व शेगॉल या दोन घटकांमुळे पाचकस्त्रावाचे प्रमाण वाढते व त्याद्वारे अन्नपचन क्रिया सुधारते. वांती, मळमळ, गॅसेस कमी होतात. ज्यांना प्रवासात मळमळ, उलटी होते त्यांनी प्रवासाला निघण्याच्या आगोदर आल्याचा लहान तुकडा तोंडात धरल्यास प्रवासात कुठलाही त्रास होत नाही. आपल्याकडील उडनशील तेल व फेनॉलमुळे श्वासवाहिन्यातील रक्तपुरवठा सुधारतो. श्वासवाहिन्या मोकळ्या होतात व कफ सुटण्यास मदत होते. त्याद्वारे सर्दी, पडसे, श्वास, कफ कमी होतो. आले हे आजार कमी करणारे आहे. आल्याच्या सेवनाने रक्तभिसरण क्रिया सुधारते. रक्ताची गुठळी तयार होत नाही (अॅन्टी क्लॉटिंग) हे कार्य अॅस्पिरीन या औषधी द्रव्याप्रमाणे दिसून येते. म्हणूनच हृदयरोगी अथवा हृदयरोग होवू नये यासाठी नित्य आल्याचे सेवन हितावह आहे. स्त्रियांना मासिक स्त्राव अनियमित, कमी आणि वेदनायुक्त असेल त्यांनी अवश्य आल्याचे सेवन करावे. आल्याच्या सेवनाने कामवासना वाढत नाही तसेच लैंगिक अशक्तपणा कमी होतो. येणेप्रमाणे आले बहुपयोगी आहे. आले सेवन करताना प्रमाणशीर घ्यावे वेळोवेळी वैद्यांचा सल्ला घेतल्यास अधिक चांगले....!
टीप:
वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी वैद्यांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)