जेजुरीतील जानाई देवीच्या पदयात्रेचे ५ मार्च रोजी होणार निवकाने येथील यात्रेसाठी प्रस्थान
जेजुरी दि.२
जेजुरी करांचे ग्रामदैवत
असलेल्या जानाई देवीची पदयात्रा मूळ ठाण असलेल्या निवकानेकडे ५ मार्च रोजी
प्रस्थान करणार आहे. कोरोन संदर्भातील नियम पाळून ही यात्रा होणार आहे. याबाबतचा
कार्यक्रम यात्रा कमिटीच्यावतीने जाहीर करण्यात आला आहे .
या यात्रेला जय्याद्री ते सह्याद्री यात्रा असेही म्हटले जाते.जेजुरी तसेच सांगली, सातारा, कराड या भागातून अनेक लोक या यात्रेत सहभागी होता असतात. जेजुरी ग्रामस्थांचे ग्रामदैवत असलेल्या जानीई देवीचे मूळ ठाण निवकाने येथे आहे .त्यामुळे हजारो जेजुरीकर या यात्रेला पायी जात असतात. शनिवार दिनांक ५ मार्च २०२२ ला देवीची पालखी सोहळा दुपारी ३ वाजता प्रस्थान करणार आहे तर संध्याकाळी पाच वाजता दौंडज खिंडीतील परडीपूजन करुन पालखी कामठवाडीत पहिला मुक्काम करेल. रविवारी पहाटे चार वाजता निरा रेल्वे फाटका नजिकच्या खिंडीत परडीपूजन, होईल तसेच पुढे निरा दत्तघाटावर स्नान करुन पुढे प्रवास सुरु होईल.संध्याकाळचा मुक्कम हा सालपे या गावी असणार आहे, सोमवारी पहाटे तीन वाजता सालपे खिंडीवरील परडीपूजन करुन पालखी पुढे निघणार आहे . ती वडू मुक्कामी सकाळी दहा वाजता पोहोचल्या नंतर अकरा वाजता नदीवरील स्नान होईल . मंगळवारी सकाळी ९ वाजता माहुलीत पोहोचल्यानंतर संगमावर सकाळी दहा वाजता समस्त ग्रामस्थांच्यावतीने महाभिषेक होईल.
प्रत्येक पत्रकाराने आरोग्य विमा घ्यायलाच हवा शिवरी येथे खा.सुप्रिया सुळे यांचे प्रतिपादन
https://www.thenewsmarathi.com/2022/03/blog-post_43.html
माहुलीतून सोहळा बुधवारी रात्री एक वाजता प्रस्थान करेल. पहाटे ३ वाजता सातारा
खिंडीवरील परडीपूजन तर सकाळी ९ वाजता सासपडे जवळील गणेश खिंडीतील परडीपूजन होईल.
दुपारी एकच्या दरम्यान पदयात्रा तारळे मुक्कामी पोहोचणार, गुरुवार दिनांक
१० रोजी तारळेमुक्काम पहाटे चार वाजता हलवून सकाळी ११ वाजता कावदऱ्या वरील
परडीपूजन करुन निवकाने येथील मंदिर
असलेल्या अत्यंत नयनरम्य परिसरात पालखी
पदयात्रा सर्वरसाधारणपणे दुपारी दोन वाजेपर्यंत पोहोचणार आहे. याच दिवशी देवीला
भाजी_ भाकरीचा नैवेद्य दाखविला जातो. मुख्य यात्रा शुक्रवार दिनांक ११
मार्च २०२२ रोजी असून पालखीचे प्रस्थान पहाटे चार वाजता धारेश्वर स्नानसाठी होणार
आहे . मुख्य मंदिरातील महाभिषेक, महाबली व होमहवन हे त्या दिवशी होणार असल्याची माहिती यात्रा
कमिटीच्या वतीने आज दिनांक 2 मार्च रोजी माध्यमांना देण्यात आली आहे .
या ठिकाणी दिनांक ११ मार्च रोजी निसग पूजेचे आयोजन वनविभाग, निसर्ग प्रेमी ,पाटण, कराड, सांगली,आणि जेजुरी करांच्या वतीने करण्यात आले आहे. ग्रामस्थांनी यात्रेत सहभागी होताना कोरोनाचे नियम पाळावेत असे आवाहन यात्रा कमिटी व प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहेत