नीरा येथे जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे व आमदार संजय जगताप यांचा करण्यात आला नागरी सत्कार.
नीरा दि.१२
नीरा (ता.पुरंदर) येथे आज दि.१२ रोजी येथे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्रा.डॉ.दिगंबर दुर्गाडे तर संजय जगताप यांची जिल्हा बँकेच्या संचालक पदी निवड झाल्याबद्दल नीरा ग्रामस्थांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला. त्याच बरोबर नीरा परिसरातील कर्तृत्ववान नागरिकांचाही सन्मान करण्यात आला.नीरा ग्रामपंचायतीच्या महिला सदस्यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला
नीरा ग्रामपंचायतीच्यावतीने आज नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले यामध्ये प्राध्यापक डॉक्टर दिगंबर दुर्गाडे आ संजय जगताप यांचे सह जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती प्रमोद काकडे,पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण अधिकारी पदी नियुक्ती झालेल्या संध्या ढमाळ,मुख्याध्यापिका स्वाती दुर्गाडे,अर्चना पोरे,यांचा नागरी सत्कार करण्यात आला.
यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुदाम इंगळे, विराज काकडे, निरेच्या सरपंच तेजश्री काकडे, उपसरपंच राजेश काकडे, ग्रामपंचायत सदस्य अनिल चव्हाण,अभिषेक भालेराव,वैशाली काळे, राधा माने, वैशाली बंडगर,संदीप धायगुडे,आनंता शिंदे,अड विजय भालेराव सारिका काकडे, सोमेस्वरचे संचालक संदीप निगडे, वाल्हे गावाचे सरपंच अमोल खवले, निरे चे माजी उपसरपंच दीपक काकडे, जावेद शेख,इत्यादी मान्यवर उपस्थित होते.