मावडी क. प . येथे आत्मा अंतर्गत कांदा पिक शेतीदिन व शिवार फेरी कार्यक्रमाचे आयोजन
जेजुरी : दि.१२
महाराष्ट्र शासन कृषि विभाग श्री. सोमेश्वर सहकारी साखर कारखाना आणि स्व. प्राचार्य हनुमंतराव चाचर विकास प्रतिष्ठान, पुरंदर यांच्या संयुक्त विद्यमाने मावडी क. प . येथे आत्मा अंतर्गत कांदा पिक शेती दिनाच्या निमित्ताने शेतकरी मार्गदर्शन व शिवार फेरी कर्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमप्रसंगी जेजुरी मंडल कृषि अधिकारी एस. जी . धुरगुडे, कृषि पर्यवेक्षक पी. डी. खेडकर श्री. सोमेश्वर सह. साखर कारखान्याचे निलेश होळकर, कृषि सल्लागार विशाल पवार, बायर कंपनी प्रा. ली . चे नितीन पाटील यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यामध्ये एस. जी . धुरगुडे यांनी सीताफळ च्या छाटणी विषयी मार्गदर्शन व प्रात्याक्षिक शेतकऱ्यांना करून दाखविले. नितीन पाटील यांनी कांदा पिकाची प्रत्यक्ष पाहणी करून कांदा रोग नियंत्रणा विषयी शेतकऱ्यांना मागदर्शन करून त्यांच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली. खेडकर यांनी हरभरा पिकाची काळजी आणि रोग नियंत्रण यावर सहभागी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून त्यांचे शंका निरसन केले. ऊस विकास अधिकारी यांनी उसाच्या ८६०३२ व २६५ या दोन्ही वाणांबाबत शेतकऱ्यांना माहिती दिली. विशाल पवार यांनी उन्हाळी कलिंगड व खरबूज लागवड व मल्चिंग विषयी शेतकऱ्यांना माहिती देऊन या पिकाकडे शेतकऱ्यांनी वाळण्याविषयी मार्गदर्शन केले.
मावडी क . प . येथील शेतकऱ्यांना सतत मार्गदर्शन प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळावे अशी प्राचार्य हनुमंतराव चाचर सर यांची धडपड असायची त्यांच्या स्मृती कायम स्मरणात राहावी. म्हणून स्व. प्राचार्य हनुमंतराव चाचर विकास प्रतिष्ठान असे उपक्रम सातत्याने घेईल. त्यांचा वसा आणि वारसा पुढे चालविला जाईल असे प्रतिष्ठानच्या अध्यक्षा श्रीमती. जयश्री चाचर यांनी याप्रसंगी मनोगतात सांगितले.
या कार्यक्रमा प्रसंगी शरदचंद्रजी पवार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . धनाजी नागणे, डॉ . अरुण कोळेकर , दशरथ कामठे, डॉ. बालाजी नाटकारे, नि. पो. अधिकारी विक्रम जगताप , बापू राणे , बाळासाहेब देशमुख , मामा घोरपडे , छबन लव्हाळे , प्रकाश भामे, विलास चाचर, काशिनाथ चाचर , विकास चाचर, भीमराव चाचर , दत्तात्रय भामे, सुकुमार भामे , महेंद्र भामे , मंगेश भामे, दिलीप भामे, प्रसाद चाचर, कुलदीप चाचर, कृषि सहाय्यक जी. व्ही . पवार, एस. एस . जाधव, संगीता चाचर , इ. उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सागर पवार यांनी स्वागत आकाश चाचर यांनी केले तर आभार तेजस चाचर यांनी मानले.