वाल्हे येथील सर्व रोग निदान शिबिरात २००
लोकांची करण्यात आली आरोग्य तपासणी
नीरा दि .११
वाल्हे (पुरंदर)
थे आज (दि. ११) रोजी वाल्हे
येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात परिसरातील लोकांसाठी सर्व रोग निदान शिबिराचे
आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये
आज दिवस भारत २०० लोकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
जिल्हा परिषद पुणे,पंचायत
समिती पुरंदर यांच्यावतीने वाल्हे (ता.पुरंदर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात
सर्व रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.वाल्हे ,पिंगोरी, आडाचीवाडी,दौंडज,राख,हरणी
पिसुर्टी ,आदी परिसरातील महिला व पुरुषांची आज आरोग्य तपासणी करण्यात आली.यामध्ये
आज २०० लोकांची आरोग्य तपासणी करण्यात आली यामध्ये र्हदयरोग, रक्तदाब, शुगर, डोळे तपासणी,व
महिलांविषयक आजारांची तपासणी करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत
आंधळे यानी दिली.
सकाळी १० वाजता पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे यांच्या
हस्ते व जिल्हा परिषद सदस्य शालिनी पवार यांच्या उपस्थितीत या शिबिराचा शुभारंभ
करण्यात आला. यावेळी सरपंच अमोल खवले,
माजी
सरपंच दत्तात्रय पवार, महादेव चव्हाण, डॉ. प्रशांत आंधळे , पर्यवेक्षक
राजेंद्र दळवी, माजी तंटामुक्ती अध्यक्ष संत्यवान सूर्यवंशी, हनुमंत पवार,
आरोग्य
सहाय्यक तानाजी मेटकरी, दिपक कुमठेकर, अमोल जाधव, अजिंक्य पडवळ
आदी मान्यवर उपस्थित होते..