Type Here to Get Search Results !

महाशिवरात्री निमीत्त माळशिरस येथे एका लाखाहून अधिक भाविकांनी घेतले भुळेस्वराचे दर्शन

 महाशिवरात्री निमीत्त माळशिरस येथे एका लाखाहून अधिक भाविकांनी घेतले भुळेस्वराचे दर्शन



  माळशिरस दि.१



पुरंदर तालुक्याच्या पुर्व भागातील माळशिरस येथील डोंगरावर वसलेल्या श्री क्षेत्र भुलेश्वर येथे आज महाशिवरात्री निमीत्त दिवसभरात एक लाखांवर भाविकांनी रांगेत उभे राहुन शिवलिंगाचे दर्शन घेतले



              महाशिवरात्री निमित्त आज पहाटे शिवलिंगास दही,दुध व पंचामृतने आंघोळ घालण्यात आली.शिवलिंगावर फुलांची आकर्षक अशी सजावट करण्यात आली. सकाळी महाआरती करुन मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. आज दिनांक 1 मे रोजी सकाळी पुरंदरचे आमदार संजय जगताप व पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेचे अध्यक्ष डॉ.दिगंबर दुर्गाडे यांनी महापुजा केली .दिवसभरात एक लाखांवर भाविकांनी या शिवलिंगाचे दर्शन घेतले .

दर्शन रांगेवरती सावलीसाठी मंडपाची सोय नसल्याने अनेक भाविकांना उन्हापासुन स्वतःचे रक्षन करण्यासाठी छञीचा आधार घ्यावा लागला.जेजुरी पोलीस स्टेशनच्या वतीने पुरेसा बंदोबस्त देण्यात आला होता .माळशिरस प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने दिवसभर आरोग्य सेवा देण्यात आली .विजेचा पुरवठा दिवसभर सुरळीत ठेवण्यात आला.मंदिरावरील वाहनकोंडी कमी करण्यासाठी वाहने वन विभागाच्या कमाणीबाहेरच थांबवण्यात आली होती .गेल्या वर्षी कोरोना रोगामुळे श्री क्षेत्र भुलेश्वरी कोणतीही याञा भरली नाही यंदा काही अंशी निर्बंध कमी झाल्याने तसेच पि एम पी एल बस सेवा सुरु झाल्याने आज गर्दीत वाढ झाली.दिवसभरात एक लाखांवर भाविकांनी शिवलिंगाचे दर्शन घेतले.दिवसभर भुलेश्वर भक्तांकडुन अन्नदान करण्यात आले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies