समाज बदलासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या घटत चालली आहे ; गुलाबराव वाघमोडे
सासवड येथे 13 वे राज्यस्तरीय छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलन संपन्न
सासवड दि.१२
पुरोगामी चळवळी पुढे मोठे प्रश्न उभे आहेत. या चळवळीत काही अपप्रवृत्ती वाढताना दिसत आहेत. फुले-शाहू-आंबेडकरी विचारांचा पुरस्कार करणारी मंडळी जातीयवादी पक्षांबरोबर युती करताना दिसत आहेत. तत्वहीन, संधीसाधूपणा चे स्वरूप या चळवळीला आले आहे. समाज बदलासाठी धडपडणार्या हृदयामध्ये आज असणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या घटत चाललेले आहे. अशी खंत ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक गुलाब वाघमोडे यांनी व्यक्त केली.
पुरंदर तालुक्यातील सासवड येथे जगद्गुरु संत तुकोबाराय साहित्य परिषद आयोजित 13 वे राज्यस्तरीय छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी संमेलनाध्यक्ष श्री वाघमोडे बोलत होते. संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ समाजवादी विचारवंत रावसाहेब पवार यांच्या हस्ते करण्यात झाले.
यावेळी ज्येष्ठ साहित्यिक भा.ल.ठाणगे, पुरंदरचे माजी आमदार अशोक टेकवडे, राष्ट्रवादीचे प्रवक्ते विजय कोलते, पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर दिगंबर दुर्गाडे, उपाध्यक्ष सुनील चांदेरे,पंचायत समिती सदस्य सुनीता कोलते,सोनाली यादव पुणे जिल्हा मराठा महासंघाचे अध्यक्ष प्रशांत वाडेकर, पुणे जिल्हा संभाजी ब्रिगेडचे उत्तम कामठेर, गौरव कोलते, पुणे जिल्हा भाजपा उपाध्यक्ष श्रीकांत ताम्हणे, सासवडचे माजी उपनगराध्यक्ष संजयआण्णा जगताप, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष बाळासाहेब भिंताडे, पुरंदर तालुका सेवादल अध्यक्ष रामभाऊ काळे, अभिनेत्री संस्कृती बालगुडे यांचे सह अनेक साहितिक, लेखक, कवी,व नागरिक उपस्थित होते.
साहित्य संमेलनाचे आयोजन दशरथ यादव, स्वागताध्यक्ष दत्ता कड, निमंत्रक सुनील धिवार, राजाभाऊ जगताप, दत्तानाना भोंगळे, सुनील लोणकर, श्यामकुमार मेमाणे, नंदकुमार दिवसे, अमोल बनकर, श्रीराज खेनट, विजय तुपे संजय सोनवणे संतोष डुबल अमोल भोसले आदींनी केले.
पुरंदरचे माजी आमदार अशोक टेकवडे यांनी सलग 13 वर्ष साहित्य संमेलन सुरू ठेवल्या बद्दल आयोजकांचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक दत्ता कड यांनी केले. सूत्रसंचालन दशरथ यादव यांनी केले. आभार सुनील लोणकर यांनी मानले.