कर्नलवाडी येथे जमावाकडून एकाला कोयत्याने मारहाण जेजुरी पोलिसात फिर्याद दाखल.
नीरा दि.२१
पुरंदर तालुक्यातील कर्नलवाडी येथे विहिरीच्या वादातून एका शेतकऱ्याला जमावाकडून कोयत्याने मारहाण करण्यात आली आहे.या संदर्भात जेजुरी पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 143, 147, 148, 149, 324, 323,504,506 महाराष्ट्र पोलीस अधिनियम 151 चे, कलम 135 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
यबाबत जेजुरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,या संदर्भात कर्नलवाडी येथील लहू उमाजी वाघापुरे या बावीस वर्षीय शेतकऱ्याने आज दिनांक २१/२/२०२२ रोजी फिर्याद दिली आहे.त्याने दिलेल्या फिर्यादी नुसार
आरोपी हिरामण सखाराम वाघापुरे, दादासो नाना वाघापुरे, बिरा हिरा वाघापुरे, विठ्ठल हिरा वाघापुरे, बायडाबाई हिरा वाघापुरे, सोनाबाई करगल सर्व राहणार कर्नलवाडी ता.पुरंदर यानी दिनांक 19/02/2022 रोजी रात्री 9.00 वा.दरम्यान मौजे झिरपवस्ती, कर्नलवाडी येथे फिर्यादीच्या घरासमोर जमाव जमावून गट नंबर 581 मधील विहीर आमची आहे असे म्हणून, उस तोडण्याचा कोयता, लाकडी काठी हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण व शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली.या बाबतचा अधिकचा तपास जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार संदीप मोकाशी करीत आहेत.