Type Here to Get Search Results !

केंद्र सरकारच सहकारा बाबतच धोरण सहकार मोडीत काढणार : प्रा.डॉ.दिगंबर दुर्गाडे

 केंद्र सरकारच सहकारा बाबतच धोरण सहकार मोडीत काढणार : प्रा.डॉ.दिगंबर दुर्गाडे

  राख येथे १६ कोटीच्या कामाचा  करण्यात आला शुभारंभ  



नीरा दि.८

       केंद्र सरकारच सहकारा बाबतच धोरण  सहकार मोडीत काढणार आहे.केंद्र सरकारच्या  येणाऱ्या  सहकार विषयक कायद्यामुळे राज्यातील सहकार उद्योग धुळीला मिळणार आहे. पण त्यातूनही मार्ग कडून राज्यातील सहकार आपल्याला जिवंत ठेवायचा आहे. आगामी  काळात सहकार पुढे अनेक संकटे असणार आहेत. यावर आपणाला मात करायला हवी, असे म्हणत पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा.डॉ दिगंबर दुर्गाडे यांनी केंद्र सरकारच्या सहकार विषयक धोरणा बाबत नाराजी व्यक्त केली.



      राख (ता. पुरंदर) येथे आज दि.८ रोजी प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांची जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाल्या बद्दल नागरी सत्कार करण्यात आला. त्याच बरोबर त्यांच्या हस्ते राख येथील विविध विकास कामाचे भूमी पूजन करण्यात आले. यावेळी आपल्या सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती प्रमोद काकडे,माजी आमदार अशोक टेकवडे, पुरंदर राष्ट्रवादीचे अध्यक्ष माणिकराव झेडे, सुदाम इंगळे, बारामती तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष राभाऊ निंबाळकर, शिवसेनेचे तालुका प्रमुख दिलीप यादव,विजय कोलते,पंचायत समिती सदस्य सुनिता कोलते, प्रदीप पोमण,नंदुकाका जगताप,गणेश जगताप, संभाजी काळाने, विठ्ठल मोकाशी, अनंता तांबे, तुषार माहुरकर,जितेंद्र निगडे, बाळासाहेब कामथे, राखाच्या सरपंच उज्वला खंडाळे ,दत्ताजी रणवरे, ग्रामपंचायत सदस्य आतुल रणनवरे,ज्योती माने,पुष्पलता जगताप,लता महानवर, निरेचे सरपंच राजेश काकडे, विलास रणवरे,राख विकास सोसायटी चेअरमन महेंद्र माने, वसंत रणनवरे, विलास रणनवरे,भूषण रणनवरे,प्रशांत रणनवरे,बाबुराव पवार,शहाजी पवार, गोरख पवार, बबनराव ताटे, गोरख रणनवरे, सुनील पवार ,मधुकर माने, स्वप्नील रणवरे, पोपट  रणवरे,  संदीप रणवरे,विनायक पवार, गोपीनाथ कदम,कांताराम चव्हाण,कुंडलिक चव्हाण,बाबुराव चव्हाण इत्यादी मान्यवर उपस्तीत होते. यावेळी मानेवस्ती रोड ते सावरकर वस्तीरोड रस्ता (१० लक्ष) ,कापडदरारोड ते गायकवाडवाडी रस्ता (१० लक्ष) , मूर्टीरोड  ते राख व राख ते हरणी-राउतवाडी फाटा रस्ता (१५ कोटी) या रस्त्याच्या  कामाचे भूमी पूजन करण्यात आले.

यावेळी सुदाम इंगळे,अशोक टेकवडे,इत्यादींनी मनोगत व्यक्त केले.यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे प्रास्तविक दत्ता रणवरे यांनी केले  सूत्रसंचालन बबन ताटे यांनी केले तर आभार श्रीकांत पवार यांनी मानले     

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies