जेजुरी येथे महिलेस लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार
जेजुरी दि.२८
पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथील महिलेवर लग्नाचे आमिष दाखवून वेळो वेळी बलात्कार केल्या
प्रकरणी पिढीत महिलेने पोलिसात फिर्याद दिली आहे. या संदर्भात पोलसांनी भारतीय दंड
विधान कलम 376,2(N),420 नुसार गुन्हा दाखल केला आहे
याबबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि, जेजुरी येथे राहणाऱ्या एका महिलेने याबाबत फिर्याद दिली आहे .तिने दिलेल्या फिर्यादी नुसार आरोपी प्रवीण लालासो पवार रा.जेजुरी ता.पुरंदर जि.पुणे याने फिर्यादी महिलेला सन 2019 पासून ते 26/2/ 2022 रोजी रात्री 11/00 वा.चे सुमारास मोजे जेजुरी गावचे हद्दीत दोरगेवाडी येथील त्यांच्या फार्म हाउस वर वेळोवेळी ता.पुरंदर जिल्हा पुणे तसच येवलेवडी,पुणे येथील भाडोत्री फ्लॅट वर वेळो वेळी नेहून तिचे लैंगिक शोषण केले . आरोपी प्रवीण लालासो पवार यांनी फिर्यादीस तुझ्याशी लग्न करून पत्नी म्हणून कायमस्वरूपी संभाळ करीन असे आश्वासन देऊन तिच्या सोबत येवलेवाडी येथील भाडोत्री फ्लॅटवर व जेजुरी दोरगेवाडी येथील आरोपीच्या फार्म हाऊस वर वेळोवेळी शरीर संभोग केला तसेच दिनांक 26/2/ 22 रोजी रात्री आक्रा वाजता दोरगेवाडी येथील फार्म हाऊस वर फिर्यादीचे संमतीशिवाय लैंगिक अत्याचार केले आहेत अशा प्रकारची फिर्याद देण्यात आली आहे याबाबतचा अधिकच तपास जेजुरी पोलीसस्टेशनचे पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांच्या मार्ग दर्शना खाली पोलीस उपनिरीक्षक गावडे करीत आहेत.