Type Here to Get Search Results !

समाज भूषण पुरस्कार समिति जाहीर - अध्यक्षपदी प्राचार्य नंदकुमार सागर यांची निवड

 समाज भूषण पुरस्कार समिति जाहीर - अध्यक्षपदी प्राचार्य नंदकुमार सागर यांची निवड 



जेजुरी,वार्ताहर  दि.७


कै.दिनकरराव सावंत प्रतिष्ठानच्या वतीने राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार समिति जाहीर करण्यात आली असून या समितीच्या अध्यक्षपदी जिजामाता हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज जेजुरी या विद्यालयाचे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्राचार्य नंदकुमार सागर यांची निवड करण्यात आली तर सदस्यपदी दैनिक पुढारीचे पत्रकार तसेच मार्तंड देवसंस्थानचे माजी विश्वस्त प्रा. नितिन राउत व उद्योजक मा.नगरसेवक,संत सोपानकाका बँकेचे सल्लागार रविंद्र जोशी व सचिवपदी पुरंदर तालुका काँग्रेस शिक्षक सेलचे अध्यक्षं प्रल्हाद गिरमे यांची निवड केली असल्याचे कै.दिनकरराव सावंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष व वृद्ध साहित्यिक कलावंत मानधन समितीचे सदस्य पत्रकार संजय सावंत यांनी सांगितले. 



 कै. दिनकर सावंत प्रतिष्ठानच्या वतीने गेली २१ वर्ष विविध क्षेत्रात सामाजिक कार्य करणार्‍या व्यक्तींना राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार देवून गौरविण्यात येते.त्याचबरोबर गरजू विद्यार्थांना शाळेत साहित्य व गणवेश वाटप, यामध्ये जिजामाता हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज जेजुरी,पुण्यश्लोक  अहिल्यादेवी विद्यामंदिर जेजुरी,विद्या महामंडळ प्रशाला कोथळे या शाळांना पाण्याच्या टाक्या बांधून देण्यात आल्या आहेत. त्याच बरोबर जेजुरी येथील स्मशानभूमिस गेट बसवून देण्यात आले आहे . विविध धार्मिक स्थळांना देणग्या व माऊली पालखी सोहळा काळात अन्नदान असे विविध उपक्रम कै.दिनकरराव सावंत प्रतिष्ठानच्या वतीने राबविले गेले आहेत. दरवर्षी समाजभूषण सोहळ्याचे आयोजन करून पुरंदर हवेलीचे लोकप्रिय आमदार संजयजी जगताप यांच्या हस्ते वितरण केले जाते.       


                       

 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies