नीरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात संत रोहिदास महाराज यांची ६४५ वी जयंती करण्यात आली साजरी
नीरा दि.१६
पुरंदर तालुक्यातील नीरा ग्रामपंचायत कार्यालयात संत रोहिदास महाराजांची ६४५ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.निरेच्या सरपंच तेजश्री काकडे यांच्या हस्ते संत रोहिदास महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.त्यांना अभिवादन करण्यात आले.
संत आणि महात्मे यांची जयंती शासकीय पातळीवर प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर साजरी करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत . त्यानुसार आज नीरा ग्रामपंचायत कार्यालयात संत रोहिदास महाराजांची जयंती साजरी करनण्यात आली.सरपंच तेजश्री काकडे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी उपसरपंच राजेश काकडे,अनिल.चव्हाण, बाळासाहेब भोसले,उत्तम आगवणे,सुरेश कांबळे,नाना डोईफोडे दत्ता कांबळे गणेश कांबळे,अमोल कांबळे,राजू देसाई, सागर बागडे,अशोक बागडे,राकेश कांबळे, ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते. माजी उपसरपंच बाळासाहेब भोसले यांनी संत रोहिदास महाराजांच्या जीवनाची माहिती दिली.ते म्हणाले की,संत रोहिदास महाराजांच कामहे केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशभर पाहायला मिळते.त्याकाळात त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम केलं.हेच काम आपण आणखी पुढे नेहुया. असे ही ते म्हणाले.