राष्ट्रीय सेवा योजनेची शिबीरे व्यक्तिमत्त्व विकासाची कार्यशाळा
- विजय कोलते
शरदचंद्रजी पवार महाविद्यालय जेजुरीचे दौंडज येथे शिबीराचे उद्घाटन
वाल्हे प्रतिनिधी: दि.६
राष्ट्रीय सेवा योजनेची विशेष शिबीरे ही विद्यार्थ्यांंच्या सर्वांगीण व्यक्तीमत्वाची एका अर्थांने कार्यशाळा ठरते.
त्यामुळे भविष्यातील कोणतीही जबाबदारी यशस्वीपणे पेलण्याची क्षमता निर्माण होते म्हणून या शिबीराचे विद्यार्थ्यांच्या जीवनात खूप महत्त्वाचे स्थान असते असे प्रतिपादन विजय कोलते यांनी दौंडज येथे बोलताना केले.
आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानच्या जेजुरी येथील शरदचंद्रजी पवार महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबीर दौडज येथे आयोजित केले आहे.
या शिबीराच्या उद्घाटनप्रसंगी व्यासपाठावर संस्थेचे अध्यक्ष विजय कोलते, माई कोलते, प्राचार्य डॉ. धनाजी नागणे, विद्यमान सरपंच सीमा भुजबळ, उपसरपंच नंदा कदम, दामु आण्णा कदम, सोपान दगडे, विजय फाळके, पोलीस पाटील दिनेश जाधव, सदस्य अर्चना भोसले, शरद जाधव, प्रा. सुभाष कदम इ.मान्यवर उपस्थित होते.
आपल्या अध्यक्षीय मनोगतात कोलते पुढे म्हणाले मी वाघीरे महाविद्यालयात असताना राष्ट्रीय सेवा योजनचे शिबीर काळदरी गावात झाले होते. त्या शिबीराच्या समारोप प्रसंगीच्या भाषणात गावातील समस्या मांडल्या होत्या. त्यानंतर मी जेंव्हा पुणे जिल्हा परिषदेचा अध्यक्ष झालो तेव्हा मी त्या भाषणाची आठवण ठेवून त्या गावच्या ज्या समस्या होत्या त्या कृतीत आणल्या यांचे आपणाला समाधान वाटते, अशी भावना व्यक्त केली.
कार्यक्रमाचे उद्घाटन दीपप्रज्वलन करुन करण्यात आले. पी.डी.सी.बँक विद्यमान अध्यक्ष प्रा.डाॅ.दिगंबर दुर्गाडे
यांनी शिबीराला सकाळी भेट देऊन विद्यार्थ्यांंशी संवाद साधून शिबीराला शुभेच्छा दिल्या. उद्घाटनप्रसंगी दौंडज गावच्या विद्यमान सरपंच सीमा निलेश भुजबळ, कृषी शास्त्रज्ञ तथा पुणे विभाग पश्चिम अध्यक्ष सरपंच सेवा महासंघ प्रा. चंद्रकांत गव्हाणे, पोलीस पाटील दिनेश जाधव, प्रा.सुभाष कदम, डॉ. धनाजी नागणे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी प्रा.डाॅ.अरुण कोळेकर यांनी केले. उपस्थितीतांचे स्वागत प्राचार्य डॉ.धनाजी नागणे यांनी केले. आभार कार्यक्रम अधिकारी प्रा.चंद्रशेखर काळे यांनी मानले.