नीरा येथील ज्येष्ठ नागरिक सभागृहात स्वातंत्र्यवीर सावरकर यांची ५६ पुण्यतिथी करण्यात आली साजरी
नीरा दि. २७
पुरंदर तालुक्यातील नीरा येथे दिनांक २६ रोजी सायंकाळी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. अखील भारतीय ब्राम्हण संघटना नाशिक, केंद्र नीरा यांच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.स्वामी विवेकानंद राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त डॉ.वीणा बाळकृष्ण पंडित यावेळी सावरकर यांच्या जीवन चरित्राची माहिती दिली
पुण्यतिथी निमित्त झालेल्या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज वीर सावरकर आणि भगवान परशुराम यांच्या प्रतिमांचे पूजन करून त्यांना आभिवादन करण्यात आले डॉ. विणा पंडित यांनी सावरकरांच्या बद्दल बोलताना त्यांच्या देश प्रेमाबद्दल व त्यागा बद्दलची माहिती दिली.सावरकरांची देश स्वतंत्र करण्या साथीची असलेली तळमळ सांगितली. तसेच स्वातंत्र्या नंतरही त्यांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागले.देश स्वतंत्र झाल्यानंतर त्यांनी सामाजिक एकोप्यासाठी केलेल्या कामाबद्दलची माहिती दिली.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शेतीनिष्ठ पुरस्कार प्राप्त मिलिंद नारायण बोकील हे उपस्थी होते. विश्वजीत तुळसे व कुमारी ऐश्वर्या विनायक पाध्ये यांना ब्राँझपदक मिळाल्याबद्दल प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
यावेळी नीरेचे उपसरपंच राजेश काकडे, नारायण कुळकर्णी, संतोष केंजले, मुकुंद बोकील ,मिलिंद बोकील,समीर पळधिकर, सचिन घोडके हरिभाऊ कुलकर्णी, गजानन मांडके,अजय कुलकर्णी, विवेक देशपांडे,योगेंद्र माने इत्यादी मान्यवरांसह अनेक नागरिक उपस्थित होते. केंद्र प्रमुख दत्तात्रय बडबडे यांनी प्रास्तविक केले, सुत्रसंचलन तर रूचा केंजळे यांनी केले तर आभार मुकुंदराव बोकील यांनी मानले.