सासवड येथील कबड्डी स्पर्धेत नव तरूण क्रीड मंडळ संघ विजयी
सासवड दि.२७
पुरंदर-हवेली चे आमदार संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पुरंदर तालुका कबड्डी असोसिएशन सासवड व नवतरुण क्रीडा मंडळ सासवड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कबड्डी स्पर्धेत सासवडच्या नवतरूण क्रीडा मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला पुरंदर-हवेली चे आमदार संजय जगताप यांच्या हस्ते आजच्या स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ पार पडला कबड्डी या देशी खेळाला प्रोत्साहन मिळावे व तरुणांमधील ऊर्जेचा सकारात्मक दृष्टीने वापर व्हावा यासाठी आमदार संजय जगताप यांच्या संकल्पना व मार्गदर्शनातून सासवड येथे या कबड्डी स्पर्धांचे आयोजन केले गेले होतं या स्पर्धेत 64 संघ सहभागी झाले होते यामध्ये सासवडचा नवतरुण क्रीडा मंडळ व भोसरीचा भैरवनाथ संघ या दोघांमध्ये अंतिम सामना झाला या अंतिम सामन्यामध्ये सासवडच्या नवतरुण मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला तर द्वितीय क्रमांक भैरवनाथ संघ भोसरी यांनी पटकावला तृतीय क्रमांक बाणेर युवा बाणेर संघाने पटकावला व चतुर्थ क्रमांक महाराजा दावडी या संघाने पटकावला आजच्या स्पर्धे मध्ये उत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार राजू राठोड या सासवडच्या नव तरूण मंडळाच्या खेळाडूला देण्यात आला तर उत्कृष्ट चढाईचा पुरस्कार सिद्धार्थ जगताप याने पटकावला. उत्कृष्ट पकड साठीचा पुरस्कार विजय मुल्ला भैरवनाथ संघ भोसरी या संघाच्या खेळाडूंने पटकावला आजच्या स्पर्धेला मोठ्या संख्येने नागरिकांनी व कबड्डी क्रीडाप्रेमी उपस्थित होते.