पोलीस पाटलांच्या विविध मागण्यांना गृहमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद.
मुंबई दि.२३
महाराष्ट्रातील पोलीस पाटलांच्या विविध मागण्यांसाठी गृह मंत्री व सचिव यांच्याशी झालेल्या चर्चेत गृहमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून पोलीस पाटलांच्या सर्व मागण्या त्यांनी मान्य केल्या आहे.
काल दिनांक २२ फेब्रुवारी रोजी राज्याचे गृहमंत्री दिली दिलीप वळसे पाटील,गृहराज्यमंत्री श्री शंभूराजे देसाई यांच्या सोबत मुंबई सह्याद्री अतिथीगृह येथे पोलीस पाटलांच्या प्रलंबित मागण्यांबाबत बैठक पारपडली. महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलीस पाटील संघाचे राज्याचे अध्यक्ष श्री बाळासाहेब शिंदे पाटील यांच्या मर्गरशनाखली पोलीस पाटलांच्या शिष्टमंडळाने गृहमंत्री पाटील यांच्याशी विविध मागण्या संदर्भात चर्चा केली.यावेळी पोलीस पाटलांचे निवृत्तीचे वय ६२ करणे,पोलीस पाटलांचा 2012
पासूनच रखडलेला प्रवास भत्ता देणे, नियुक्तीचे नुतनीकरण करणे,त्याच बरोबर मानधनात वाढ करणे या मागण्यावर चर्चा करण्यात आली.या सर्व मागण्यांना गृहमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. राज्याची आर्थिक परिस्थिती पाहता मानधन वाढ करणे लगेच शक्य नसले तरी आगामी वर्षभरात यावर निर्णय घेण्याचे गृहमंत्र्यांनी आश्वासन दिले आहे.या व्यतिरिक्त बहुतांश मागण्या त्यांनी मान्य केल्या आहेत.याबाबतचं आदेश लवकरच परित करण्यात येईल.
यावेळी झालेल्या बैठकीला महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश शेठ, राज्याचे महसूल विभागाचे मुख्य सचिव व प्रशासनाचे इतर महत्वाचे अधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलीस पाटील संघाचे राज्य अध्यक्ष श्री बाळासाहेब शिंदे पाटील यांनी पोलीस पाटलांच्या मागण्या खंबीरपणे मांडल्या. त्या लवकरात लवकर मंजूर कशा होतील याबाबत इतर दाखले देऊन व्यवस्थितरित्या बैठकीत मांडणी केली. यावेळी संघटनेचे राज्याचे सचिव मांगले पाटील , पुणे जिल्हा अध्यक्ष साहेबराव राळे पाटील, राज्य संघटक बळवंतराव काळे पाटील, कोकण विभागाचे अध्यक्ष श्री साईनाथ पाटील, कोकण विभागाचे कार्याध्यक्ष गिरिधर पाटील ,राज्य कार्यकारिणी सदस्य हनुमंत हंडाळ पाटील, पुणे जिल्हा कार्याध्यक्ष विजय कुंजीर पाटील,पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष दादा पाटील काळभोर, महाराष्ट्र राज्याचे सहसचिव डी.एस.कांबळे पाटील, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष बाजीराव पाटील, राज्य खजिनदार निळकंठ थोरात पाटील, ठाणे जिल्हाध्यक्ष अशोक पाटील , लक्ष्मणराव शितोळे पाटील अध्यक्ष मावळ तालुका , भिवंडी तालुका अध्यक्ष ठाकरे पाटील, संजय जाधव पाटील, पुणे जिल्हा उपाध्यक्ष ,श्री शांताराम सातकर पाटील, अविनाश शेंडगे पाटील, जयसिंग भंडारे पाटील वाल्हेकर पाटील ,श्री पाचुंदकर व इतर पोलीस पाटील उपस्थित होते.