मुकादमवाडी येथे शेतीच्या वादातून दोन भावांमध्ये मारामारी परस्पर विरोधी फिर्याद दाखल
वाल्हे दि.२८
पुरंदर तालुक्यातील वाल्हे नजीक असलेल्या मुकादमवाडी येथे शेतीच्या वादातून दोन भावानंमध्ये मारहाणीचा प्रकार घडलाअसून याबाबत जेजुरी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. यासंदर्भात पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 324, 341, 323, 504,506,34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात जेजुरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की याबाबत कैलास बाबसों गाडेकर व प्रल्हाद बाबासो गाडेकर यांनी परस्पर विरोधी फिर्याद दिली आहे .कैलास गाडेकर यानी दिलेल्या तक्रारी नुसार
दि.27/2/2022 रोजी सकाळी 11/30 वा मुकडामवडी,शेती गट न 4981 मधे फिर्यादी हे भाड्याने ट्रॅक्टर घेऊन शेती नागरत असल्याच्या कारणावरून आरोपी प्रलाद बाबसो गाडेकर यांनी ट्रॅक्टर अडवून शेती नांगरायची नाही असे म्हणून मशागतीस विरोध केला. तर आरोपी नंदा प्रलाद गाडेकर याने फिर्यादी यांच्या हातातील कुऱ्हाड फिर्यादी यांच्या उजव्या हातावर मारून दुखापत केली व शिवीगाळ,दमदाटी केली आहे.
तर प्रल्हाद बाबासो गाडेकर यांनीही कैलास बबासो गाडेकर यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. कैलास गाडेकर यांनी फिर्यादी याना शेती नगरण्यासाठी मनाई केली. कोर्टात वाद चालू असे बोलून फिर्यादी यांना शिवीगाळ,दमदाटी केली त्यानंतर फिर्यादी हे घरी आले असता कैलास गाडेकर याने फिर्यादी यांना शिवीगाळ दमदाटी करून फिर्यादी यांच्या हातातील कुऱ्हाड घेऊन फिर्यादी यांच्या कपाळावर मारून दुखापत केली,तसेच फिर्यादी यांची पत्नी भांडण सोडवण्यासाठी आली असता त्यांना ही कैलास गाडेकर याने ढकलून दिले. यामध्ये त्यांच्या उजवा हाताच्या खांद्याच्या संध्याचे विघटन होऊन गंभीर दुखापत केली,तसेच कुऱ्हाडीचा दांद्याने मारहाण केली आहे. अश्या प्रकारे दोघांनीही परस्पर विरोधी फिर्याद दिली आहे. या याबाबतचां अधिकचा तपास पोलीस हवालदार संतोष मदने व पोलीस नाईक पवार करीत आहेत.