अपंग विकास संघाच्या आंदोलनाची तातडीने दखल
अपघात प्रणव क्षेत्रांच्या दुरुस्तीला
सुरुवात,
आठ दिवसात संपुर्ण सर्व अपघात प्रवण
क्षेत्रांची दुरूस्ती करणार
सासवड (प्रतिनिधी) : सासवड जेजुरी या श्री
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावर सातत्याने होत असलेले अपघात त्याचबरोबर
अपघात प्रवण क्षेत्राची दुरुस्ती करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करून देखील
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण सदरच्या अपघात सदरचा अपघात प्रवण क्षेत्राची
दुरुस्ती करत नसल्याने अपंग विकास संघाचे अध्यक्ष अमोल बनकर यांनी आज दिनानक ८
रोजी पुलातच ठिय्या आंदोलन सुरू केले. यानंतर
या मार्गावरील सर्व अपघात प्रणव क्षेत्रांची आठ दिवसात दुरुस्ती करण्याचे आश्वासन
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे उपव्यवस्थापक अनिल गोरड यांनी यावेळी दिली.
यावेळी या अपघातप्रवण क्षेत्रावर
असणारे बॉरीग्रेड हटविण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या. व हे बॉरीग्रेड लगेच
काढुण टाकण्यात आले. व आता या पुला वरुन एकेरी वाहतूक सुरू करण्यासंदर्भात
अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. त्या अनुषंगाने डबल पुलावर असणारी वाहतूक अता
दुहेरी पद्धतीने सुरू राहील.
सासवड जेजुरी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९६५ वरील बोरावके मळा नजीक पुलावर, अपघात प्रणव क्षेत्रावरची तातडीने दुरुस्ती व्हावी यासाठी अपंग विकास
संघाच्या वतीने अमोल बनकर व सहकाऱ्यांनी सुरू केलेल्या ठिय्या आंदोलनाची तातडीने
दखल घेत तेथे दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे
या मागणीसाठी बनकर यांनी मंगळवारी बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले होते.
यावेळी बनकर यांनी सकाळी धोकादायक पुलावर, आंदोलनाला सुरुवात
केली होती. यावेळी संभाव्य अपघाताचा धोका ओळखून पोलीसां च्या हस्तक्षेपाचा नंतर
अधिकाऱ्यांच्या भेटीच्या आश्वासनावर त्यांनी रस्त्याच्या बाजूला आंदोलन सुरू केले.
याची तातडीने दखल घेत आनिल गोरड यांनी आंदोलन स्थळाला भेट देऊन
आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. व त्यांच्या मागणीनुसार बोरावके मळा येथील पुलाची
दुरूस्ती व खळद येथील सेंट जोसेफ इंग्लिश मीडियम स्कूल समोरील अपघात प्रणव
क्षेत्राच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आली.
याप्रसंगी त्यांच्या समवेत अजित
कामथे,शहाजी सस्ते, खळद ग्रामपंचायत सदस्या नम्रता कादबाने,विकास कादबाने, शिवाजी कोलते, आत्माराम खळदकर, चंद्रकांत कामथे, दत्ता भोंगळे,
जिल्हा समता परिषदेचे प्रसिद्धी प्रमुख
किशोर वचकल, नवनित कादबाने,चंद्रकांत झगडे,रामदास लांगी, बाळासाहेब धुमाळ,
हरिभाऊ फुले वसंत शिवरकर,
नारायण कामथे, सुरेश कामथे, समिर कामथे, हनुमंत वाघले, अमृत भांडवलकर, सुनिता कसबे, पंकज धिवार उपस्थित होते.