सौ.लिलावती रिखवलाल शहा कन्या विद्या मंदिर येथे राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा
नीरा दि.१
नीरा (ता.पुरंदर) येथील सौ.लिलावती रिखवलाल शहा कन्या विद्या मंदिर येथे राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी विज्ञान दिन साजरा केला.यामध्ये विज्ञानातील विविध तत्त्वे, ऊर्जेचा नियम, प्रयोगशाळेतील साहित्य, पर्यावरण रक्षण अशा विविध विषयांवर आधारित रांगोळीचे वर्गासमोर व घरासमोर देखील रेखाटन करण्यात आले.
२८ फेब्रुवारी १९२८ रोजी भारतीय भौतिकवादी चंद्रशेखर वेंकटरमन यांनी भारतातील रमन परिनामाचा शोध लावला .तेव्हापासून २८ फेब्रुवारी हा दिवस भारतामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो . विज्ञानातील नोबेल पारितोषिक मिळवणारे रमण यांनी संगीत वाद्यांच्या ध्वनिशास्त्रावरही काम केले. त्यांच्या या कार्याचा परिचय विद्यार्थ्यांना व्हावा म्हणून भारतात सर्व महाविद्यालये ,विद्यापीठे व शिक्षण संस्था हा दिवस खूप उत्साहाने साजरा करतात. नीरा येथील कन्या शाळेमध्ये देखील विविध उपक्रमांतून विज्ञान दिन साजरा झाला. स्वयंपाक घरातील विज्ञान, भविष्यकाळातील दळणवळण अशा विविध विषयांवर विद्यालयातील इयत्ता पाचवी ते दहावी अखेरच्या विद्यार्थिनींनी सुंदर हस्ताक्षरात निबंध लेखन केले .तसेच विज्ञानातील विविध तत्त्वे, ऊर्जेचा नियम, प्रयोगशाळेतील साहित्य, पर्यावरण रक्षण अशा विविध विषयांवर आधारित रांगोळीचे वर्गासमोर व घरासमोर देखील रेखाटन केले. शास्त्रज्ञ चंद्रशेखर रमण यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाच्या प्राचार्य निवेदीता पासलकर व पर्यवेक्षक उत्तम लोकरे यांनी केले. यावेळी मार्गदर्शन करताना नवोदिता पासलकर म्हणाल्या की, "नवनवीन तंत्रे यंत्रे तंत्रज्ञान हे बदल सर्व विज्ञानामुळे होत आहेत ,आपल्या समाजामधील ज्या अंधश्रद्धा होत्या त्या विज्ञानामुळे नष्ट झाले आहेत. त्यामुळे विज्ञानाची सर्व मुलींनी कास धरावी व जगाच्या इतिहासात विज्ञान क्षेत्रात आपल्या भारताने नावलौकिक मिळावा यासाठी संशोधक व्हावे. विद्यालयातील सर्व विज्ञान शिक्षकांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. यावेळी शीतल शिंदे, रूपाली रणनवरे ,राजश्री चव्हाण, कुणाल खैरकार, अश्विनी खोपे, संजय भोसले व सर्व सेवक उपस्थित होते