पिंपरे येथे पुणे पंढरपूर मार्गावर कार व
मोटारसायकलचा अपघात दोनजण गंभीर जखमी
नीरा दि .२६
नीरा
(ता.पुरंदर) नजीक असलेल्या पिंपरे येथे आज सकाळी कार आणि मोटार सायकल यांच्यात भीषण अपघात झाला. यामध्ये मोटार
सायकल वरील दोन जन गंभीर जखमी झाले आहेत.तर
कारचालक किरकोळ जखमी झाला आहे.
याबाबत प्रत्यक्ष दर्शी लोकांनी दिलेली माहिती अशी की, आज दिनांक २६ फेब्रुवारी रोजी सकाळी निरा येथिल दोन तरूण अवधूत शंकर ठोंबरे व ओमकार बाळासाहेब लोणार हे व्यायामासाठी गुळुंचे येथील बोलाई देवीच्या डोंगराकडे निघाले होते. पिंपरे येथील नीरा डावा कालव्या जवळील अरुंद रस्त्यावर जेजुरी बाजूकडून आलेल्या कारने ( क्र.एम एच २० ईई४९३८ ) त्यांच्या मोटार सायकलला( क्र.एम एच १२ एम ७३७०) ला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, मोटार सायकलचे पूर्ण नुकसान झाले. कारने धडके नंतर मोटार सायकलला २० फुट फरफटत नेले.रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला कार धडकल्याने ती थांबली यामध्ये कार चालकही जखमी झाला आहे. या सर्व जखमीवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असावा असा अंदाज प्रत्यक्षदर्शी लोकांनी व्यक्त केला आहे.